मुंबई

कसा असेल यंदाचा सिद्धिविनायक मंदिरातील माघी गणेशोत्सव, जाणून घ्या

सुमित सावंत

मुंबई: माघी गणेशोत्सवाला आजपासून सिद्धिविनायक मंदिरात सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू झालेला उत्सव १९ तारखेपर्यंत असणार आहे. आज अग्निस्थापणा , गणुहोमने उत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढच्या १९ तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या नित्य उत्सव काळातील पूजा केल्या जाणार आहे. पण यंदा इतर सणांप्रमाणे माघी गणेश उत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे. 

यापूर्वी भक्तांना देण्यात आलेल्या QR कोडच्या नोंदणी प्रमाणे तेवढ्याच भक्तांना प्रवेश देण्यात येणार आहे.  तसेच दरवर्षी निघणारी श्रींची रथयात्रा यंदा प्रथमच नगर प्रदक्षिणा करणार नसून मंदिर आवारातच ही यात्रा केली जाईल. कोरोना संदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करून यंदाचा उत्सव वाजता करण्यात येत आहे. 

माघी गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारची नियमावली

  • मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत, आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत. 
  • मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता 4 फूट आणि घरगुती गणपती मूर्तीची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. 
  • या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर मूर्तींचं पूजन करावं. 
  • मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं.
  • माघी सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्य्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरं आयोजित करावी. तसंच श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क इत्यादीद्वारे उपलब्ध करावी. 
  • गणपती मंडपात निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. 
  • मंडपात एकावेळी 10 पेक्षा जाता कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसंच एकावेळी फक्त 15 भाविकांना दर्शनासाठी प्रवेश द्यावा. 
  • मूर्ती विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त 5 कार्यकर्ते असावेत.

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

maghi ganpati 2021 siddhivinayak mandir how will celebrating aadesh bandekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तेजस्वी यादव महाआघाडीचे CM पदाचे उमेदवार, आता NDAने सांगावं, नाहीतर महाराष्ट्रासारखं कराल; भाजपवर टीका

Premachi Goshta 2 Review: मैत्री, प्रेम आणि भावनिक नात्याचा सर्वांगसुंदर कलाविष्कार, कसा आहे ललितचा 'प्रेमाची गोष्ट २' सिनेमा?

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला सूर गवसला, श्रेयस अय्यरही पेटला! हर्षित राणाच्या वादळी खेळीने भारताला पोहोचवले अडीचशे पार

Latest Marathi News Live Update : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेल्या महिला भाविकांना भाऊबीजच्या निमित्ताने 10 रुपयांची नोट भेट

Yearly Horoscope: हे वर्ष तुम्हाला कसे जाणार..? नशिबाची दारं उघडणार की आणखी प्रतिक्षा..?

SCROLL FOR NEXT