Tejas Thackeray 
मुंबई

Dasara Melava: तेजस ठाकरेंची दिसली जादू! तरुणाईला आवरला नाही सेल्फीचा मोह

शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी तेजस ठाकरेंनी देखील हजेरी लावली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवेसनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर नुकताच पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबातील सर्वजण या मेळाव्याला हजर होते. उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तेजस ठाकरेंची यावेळी तरुणाईला भूरळ पडल्याचं दिसून आलं. तेजससोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांनी गर्दी केल्याचं माध्यमांच्या कॅमेरॅनी टिपलं. (magic of Tejas Thackeray at Dasara Melava youth seen taking selfies)

शिवेसेनेच्या मेळाव्यावेळी व्यासपीठावर ठाकरेंना पाठिंबा असणारे सर्व जुने शिवसैनिक उपस्थित होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील व्यासपीठावर होते. पण रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे व्यासपीठाखाली पहिल्या रांगेत बसले होते. शिवसेनेनं दसरा मेळाव्याची प्रसिद्धी करताना प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवर तेजस ठाकरेंचा देखील फोटो लावला होता. त्यामुळं खरंतर तेजस यांना लॉन्च केलं जाईल असंही बोललं जात होतं, पण तसं झालं नाही.

मात्र, तेजस ठाकरेंची जादू यावेळी पहायला मिळाली. मेळाव्याला आलेल्या तरुणांनी तेजस यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. या तरुणांच्या विनंतीलाही त्यांनी प्रसिसाद दिला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यांच्या या कृतीमुळं सर्वसामान्य तरुणांमध्ये मिसळणारा ठाकरे घरातील व्यक्ती म्हणूनही त्याची प्रतिमा तयार होण्यास मदत होऊ शकेल.

दरम्यान, उद्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. गद्दारी, हिंदुत्व, महागाई अशा विविध मुद्द्यांवरुन त्यांनी चौफेर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT