Rajendra Singh sakal media
मुंबई

नद्यांना नाले बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील; वॉटरमन सिंह यांनी सोडले टीकास्त्र

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याणला प्रशस्त असा खाडी किनारा लाभला आहे, उल्हास, वालधूनी नदी या तालुक्यातून वाहते मात्र आज या खाडी, नद्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले असून त्या अखेरच्या घटका मोजत आहे. शासन तर या नद्यांना नाले बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची खोचक टीका मॅगसेसे पुरस्कार (Magsaysay award) विजेते वॉटरमन राजेंद्र सिंह (Rajendra singh) यांनी कल्याण येथे सरकारवर केली आहे. कल्याण खाडीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नद्यांची (ulhas nad waldhuni river) पहाणी गुरुवारी राजेंद्र यांनी केली. यावेळी त्यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे (Mumbai university) माजी कुलगुरु डॉ. अरुण सावंत, काही खासगी शाळांतील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

उल्हासनदी बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. जर येथील स्थानिक नागरिक जागरुक नसती तर शासन दरबारी आज या नद्यांची नाले अशीच नोंद झाली असती. आणि आपले सरकार नद्यांना नाले बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईतील पाच नद्यांनाही नाले बनविले गेले आहे. मात्र आम्ही सर्व नद्यांची पहाणी करुन शासन दरबारी त्यांची नदी अशी नोंद करुन घेतल्याचे राजेंद्र यांनी यावेळी सांगितले. कल्याण, अंबरनाथ मधील नद्या सध्या आयसीयूमध्ये असून त्यांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न झाले नाहीत तर नद्या वाचणार नाही अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कल्याण खाडीशेजारी असलेल्या कचराभूमी बाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले, खाडीकिनारी किंवा नदी शेजारी कधीही डंम्पिंग ग्राऊंड असता कामा नये, हा सर्वात मोठा अपराध आहे. कचऱ्यातील रासायनिक घटक पाण्यात मिसळून तेथील जलसंपदा धोक्यात येते. तसेच भूमि देखील पूर्णपणे पडीक बनत असल्याने शासनाने तातडीने हे डंम्पिंग ग्राऊंड बंद केले पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT