Folk Artist Sakal
मुंबई

Mahaparinirvan Din : लोक कलावंताकडून शिवाजी पार्कवर गायनाची मेजवानी

शिवाजी पार्कवर पोहचल्याबरोबर अशा अनेक गीतांचे बोल ऐकायला येते, डफळी, ढोलकी आणि पेटीच्या असा मोजक्या संगीत वाद्यांचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गायनातून अभिवादन वाहिण्याचे काम लोक कलावंत करत आहे.

प्रशांत कांबळे ,

शिवाजी पार्कवर पोहचल्याबरोबर अशा अनेक गीतांचे बोल ऐकायला येते, डफळी, ढोलकी आणि पेटीच्या असा मोजक्या संगीत वाद्यांचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गायनातून अभिवादन वाहिण्याचे काम लोक कलावंत करत आहे.

मुंबई - भिमा घे पुन्हा जन्म तु...

या दिनांनसाठी...

कधी होतील भिमा भेटीगाठी

भिमा घे पुन्हा जन्म तु...

या दिनांनसाठी...

शिवाजी पार्कवर पोहचल्याबरोबर अशा अनेक गीतांचे बोल ऐकायला येते, डफळी, ढोलकी आणि पेटीच्या असा मोजक्या संगीत वाद्यांचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गायनातून अभिवादन वाहिण्याचे काम लोक कलावंत करत आहे. विदर्भातील अकोल्या जिल्ह्यातून राहुल तेलगोटे आपल्या काही दिव्यांग बांधवांना घेऊन सोमवारी शिवाजी पार्कवर पोहचले आहे. तेलगोटे यांच्या सारखे असे अनेक लोक कलावंत शिवाजी पार्कवर ठिकठिकाणी बसून गायनातून अनुयायांना आंबेडकरी गीत म्हणून मंत्रमुग्द करत असल्याचे दिसून येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिनाच्या निमित्ताने अभिवादन वाहायला आलेल्या आंबेडकरी अनुयायांमूळे शिवाजी पार्क तुडूंब भरले आहे. देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांसाठी महानगरपालिकेने राहण्यासह जेवण, पाण्याची सोय केली आहे. राहण्याच्या ठिकाणी एलएडी स्क्रिन लावण्यात आले आहे. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणाचा कार्यक्रम त्यावर लाईव्ह दाखवल्या जाणार आहे. सध्या या स्क्रिनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रपट, गीत दाखवले जाते. मात्र तरीही लोककलावंताकडून गायनाचे कार्यक्रम आंबेडकरी अनुयायांना आकर्षीत करत आहे.

गानं ऐकणाऱ्या अनुयायांकडून एखाद्या गीताची मागणी आली, त्या गीताला सुद्धा आम्ही गातो, आंबेडकरी गीत लोकांना प्रेरणा देते, गीतांच्या माध्यमातून विचारांचे प्रबोधन होते. अधिक प्रभावीपणे विचारांची पेरणी केल्या जाते. गीतांमधून तेवढ्याच प्रभावीपणे राजकारण, समाजकारण आणि चळवळीवर भाष्य सुद्धा केल्या जाते. त्यामूळे अनुयायांना आंबेडकरी गित अधिक आवडतात, त्यामूळे दरवर्षी आम्ही चैत्यभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन वाहिण्यासाठी येतो. त्यानंतर दोन दिवस शिवाजी पार्क येथे वास्तव्यात राहून भिम गितांची मैफील भरवल्या जाते. त्याला अनुयायांकडून सुद्धा तेवढ्याच प्रभावीपणे दाद दिल्या जात असल्याचे तेलगोटे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT