Maha Brands sakal
मुंबई

Sakal Mahabrands : महाराष्ट्रातील कर्तबगार उद्योजक, व्यावसायिकांचा 'सकाळ माध्यम समूहा'तर्फे विशेष सन्मान

देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तबगार उद्योजक, व्यावसायिकांचा 'सकाळ माध्यम समूहा'तर्फे विशेष सन्मान आज (ता. १२) मुंबईत होणार.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तबगार उद्योजक, व्यावसायिकांचा 'सकाळ माध्यम समूहा'तर्फे विशेष सन्मान आज (ता. १२) मुंबईत होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची साठ वर्षे पूर्ण होत असताना २०२० मध्ये 'महाब्रँड्स'ची संकल्पना सर्वप्रथम 'सकाळ माध्यम समूहा'ने मांडली; पण कोरोना संकटामुळे ती २०२१ मध्ये प्रत्यक्षात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील विविध यशवंतांच्या कर्तबगारीची कथा म्हणजे महाब्रँड्स होय. पहिल्या पिढीतील उद्योजकांपासून अनेक पिढ्यांचा वारसा असलेल्या कामगिरीची दखल या 'महाबँड्स' मध्ये घेतली गेली आहे. सहकार, शिक्षण, बांधकाम, वैद्यकीय, निर्मितीउद्योग यांसह अनेक क्षेत्रांतील नामवंतांच्या घोडदौडीची नोंद याअंतर्गत घेण्यात आली आहे.

व्यवसाय म्हणजे संघर्ष, व्यवसाय म्हणजे आव्हाने, व्यवसाय म्हणजे स्पर्धेत टिकणे, व्यवसाय म्हणजे नवतेचा ध्यास, व्यवसाय म्हणजे दूरदृष्टी, व्यवसाय म्हणजे व्यवस्थापन, व्यवसाय म्हणजे बदलांना आत्मसात करणे, या सर्वांची जाण असणारे व्यवसाय 'महाब्रँड' म्हणून नावारूपाला येतात. त्यांच्या प्रेरक वाटचालीचा दस्तऐवज 'सकाळ महाब्रँड्स' उपक्रमाद्वारे लिहिला गेला आहे. त्या सर्व 'महाबँड्स'चा सन्मान सोहळा मुंबईत होणार असून, या कार्यक्रमाला फक्त निमंत्रितांनाच प्रवेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT