मुंबई

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पूजा विचारे

मुंबईः राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मंगळवारी पार पडले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टीका केली. सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांवर आणि प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसारखे विकृत राजकारण आम्ही करत नाही. मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. 

भातखळकर यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. महा भकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही.  अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार?

यासोबतच भातखळकर यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या... त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल, अतुल भातखळकर यांनी अशा शब्दात ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 


काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

विकृत राजकारण आम्ही करत नाही. या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नाही. देशात आदर असलेल्या संस्थांना घरच्या नोकरांसारखे वापरले जात असेल आणि त्याचा वापर जर आमच्याविरोधात केला जात असेल, तर ते सहन करू शकत नाही. कोणीही उठावे आणि टपली मारून जावे हे आता होणार नाही. हे सरकार विनासंकट चालेल.

 maharashtra assembly BJP Atul Bhatkhalkar warning CM Uddhav Thackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT