Padalkar and Jitendra Awhad workers fight in Assembly lobby: विधानभवनाच्या लॉबीत आज(गुरुवार) मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकमेकांचे कपडेही फाडण्याचा प्रयत्न झाला.
या घटनेमुळे विधानभवनात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरानंतर जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले आहेत, तर गोपीचंद पडळकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून जाणे पसंत केले.
प्राप्त माहितीनुसार पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख यांना मारहाण केली. परंतु नितीन देशमुख नेमके कोण आहेत, मी त्यांना बघितलंही नाही असं पडळकरांनी म्हटलं आहे.
या प्रकरानंतर जिंतेंद्र आव्हाड प्रचंड संतापले अन् मीडियाला प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘’ही अतिशय निच्चोतम पातळी त्यांनी गाठली आहे. जे काय सुरू आहे ते चांगलं सुरू आहे, काय बोलणार? कुणालाही पासेस दिल्याने असे प्रकार घडत आहेत. हल्ला कुणी केला.. तुमच्यात बोलायची हिंमत नाहीतर मला कशाला विचारताय.. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय कोणी हल्ला केलाय, आम्हाला यापेक्षा जास्त पुरावेच द्यायचे नाहीत.’’
याशिवाय ''जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील, तर आमचेच जीव सुरक्षित नाहीत. मी स्वत: ट्वीट टाकलं आहे, मला आई-बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत. तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर काय अजून काय-काय लिहिलं आहे... काय चाललंय काय विधानसभेत?'' असा सवाल आव्हाडांनी केला आहे.
याचबरोबर ''मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडी मोकळी हवा घ्यायला बाहेर गेलो होतो, हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते. म्हणजे विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, भवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवाल्यासारखं येतो आमच्या आई-बहिणीवरून शिव्या देतोय.. मग ही अधिकृत भाषा म्हणून जाहीर करा ना..असंसदीय शब्द वापरले जातात.. करून टाका जाहीर संसदीय शब्द आहेत म्हणून.. सत्तेचा एवढा मुजोरपणा सत्तेचा एवढा माज?'' अशा शब्दांत आव्हाडांनी मीडियासमोर संताप व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.