मुंबई

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक: NCP ला मर्जीतील अध्यक्ष हवा आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अद्याप व्हीप जारी केलेला नाही.

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये पदवाटपाचं जे सूत्र ठरलय, त्यानुसार विधानसभा अध्यक्षपद (Maharashtra assembly speaker post) काँग्रेसकडे (congress) येणार आहे. पण काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्ष पदाच्या उमेदवारावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. सध्यातरी काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopte) यांचे नाव आघाडीवर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Govt) स्थापनेच्यावेळी मंत्रिपदाची त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते. (Maharashtra assembly speaker post election will ncp oppose congress candidates)

संग्राम थोपटे यांच्याप्रमाणेच काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही विधनासभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही नावांना विरोध होऊ शकते. कारण संग्राम थोपटे यांचं पूर्वीपासून पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फारसं सख्य नाहीय. दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही नावाना राष्ट्रवादीकडून समर्थन मिळण्याची शक्यता कमी दिसते.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना,काँग्रेसकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अद्याप व्हीप जारी केलेला नाही. राष्ट्रवादीने व्हीप जारी न केल्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या मर्जीतील अध्यक्ष हवा आहे का? राष्ट्रवादी अजूनही तटस्थ का? अशी चर्चा सुरु झालीय. येत्या पाच आणि सहा जुलैला दोनच दिवस पावसाळी अधिवेशन होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवारावर अजून शिक्कामोर्तब न झाल्याने आज पुन्हा महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आमदारांची RTPCR टेस्ट करावी लागणार आहे. 48 तास अगोदर ही टेस्ट करावी लागणार आहे. यासाठी विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित कारण्यासाठी दिल्लीतील नेते उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे. उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कडून राज्यपालांना पत्र पाठविण्यात येणार आहे. दरम्यान कुठलीही गडबड होऊ नये यासाठी आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

सचिन तेंडुलकरसोबत केलं भारतीय संघात पदार्पण; वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून घ्यावी लागली निवृत्ती

Latest Marathi News Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला नोटीस

SIP Investment: फक्त 3,500 रुपयांच्या SIP मधून 3 कोटींचा फंड! करोडपती बनण्याचा फॉर्म्युला कसा काम करतो? गणित पाहा!

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

SCROLL FOR NEXT