death 2.jpg 
मुंबई

मनसुख यांचा मृतदेह आढळलेला त्याच खाडीत आज आणखी एक मृतदेह सापडला

दीनानाथ परब

मुंब्रा रेती बंद खाडीजवळ आणखी एक मृतदेह सापडला आहे. काही दिवसांपूर्वी याच खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. आज मुंब्रा रेती बंदर खाडीजवळ जो मृतदेह सापडलाय, त्याची ओळख पटली आहे. शेख सलीम अब्दुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो ४८ वर्षांचा होता. शेख सलीम अब्दुल मुंब्रा रेतीबंदरचाच राहणारा होता. पोलीस अधिकाऱ्यांकडे हा मृतदेह सोपवण्यात आला आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली होती. त्यानंतर काही दिवसांनी ही कार ज्यांच्याकडे होती, त्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याच मुंब्र्याच्या खाडीत त्यांचा मृतदेह सापडला होता. 

शेख सलीम अब्दुल तिथे का गेले होते?
मृत व्यक्तीचे नाव शेख सलीम अब्दुल असून तो मुंब्रा रेतीबंदरचा रहिवाशी आहे. पेशाने तो मजूर आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास तो तिथे असाच फिरण्यासाठी म्हणून गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरुन तो खाडीत पडला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

ही घटना घडल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केलं. 
अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडीतून अब्दुल यांचा मृतदेह बाहेर काढला. अब्दुल यांचा सुद्धा बुडूनच मृत्यू झाला. अब्दुल यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यांना लगेचच जवळच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. 

मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी यामध्ये काही चुकीचे घडले नसल्याचे पोलिसांचे मत आहे. पण शवविच्छेदन अहवालातूनच बऱ्याच गोष्टी समोर येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मराठवाड्यात किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार? एका क्लिकवर वाचा

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

Morning Breakfast Recipe: Fit राहायचंय? मग सकाळी नाश्त्यात बनवा ज्वारीच्या पीठापासून मस्त नाश्ता, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT