Maharashtra Budget 
मुंबई

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून 'नमो शेतकरी महासन्मान योजने'ची घोषणा; सविस्तर जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेत मांडत आहेत. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शासनानं अधिक अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊयात. (Maharashtra Budget 2023 Fadnavis announces Namo Shetkari Mahasanman Yojana need to know details)

फडणवीस म्हणाले, "अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत शासनाच्या अनुदानाची भर घालणारे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो"

काय आहे ही योजना?

या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६,००० रुपयांत राज्य सरकार आणखी ६,००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना १२,००० रुपये प्रतिवर्षी मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

यासाठी २०२३-२४ साठी ६,९०० कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे. केंद्र सरकारनं २०१६च्या पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यानं भरण्याची तरतूद आहे. आता हा भारही शेतकर्यावर न ठेवता त्याच्या हिस्स्याचा विमा हप्ता राज्य शासन भरेल. शेतकऱ्याला केवळ १ रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर नोंदणी करता येईल, असंही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT