victim of epidemic of corruption Uddhav Thackeray nanded hospital case  esakal
मुंबई

Caste Census: "हिंदू एकत्र येताहेत म्हणून जातनिहाय जनगणनेचा मुद्दा काढला"; भाजपचं ठाकरेंवर टीकास्र

बिहारच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : बिहारसह चार काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

यावर आता भाजपनं प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू एकत्र येत असल्यानेच जातीय जनगणनेचा मुद्दा ठाकरेंना उपस्थित केला आहे, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. (Maharashtra Caste Census BJP Ashish Shelar criticized on Shiv Sena Uddhav Thackeray)

हिंदू एकत्र येतोय याची त्यांना भीती वाटतेय

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जातीय जनगणनेचा विषय का नाही काढला. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आल्यानंतर हा विषय उपस्थित करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

काय हेतू आहे याचा? मोदींच्या मागे समस्त देश आहे, संपूर्ण भारतीय आहेत. आज एकत्र हिंदूंना असं वाटतंय की एकत्रित राहून आपण देशाच्या विकासात योगदान दिलं पाहिजे. त्यामुळं हिंदू एकत्र येतोय याची त्यांना भीती वाटतेय, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

...म्हणून त्यांच्या डोक्यात प्रश्न पडतात

म्हणून मग उद्धव ठाकरे सभेत प्रश्न उपस्थित करतात की, हिंदू मोर्चे का काढत आहेत? हा प्रश्न खरंतर एमआयएमनं विचारला पाहिजे तुम्ही का विचारता? हिंदू एकत्र आला की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या डोक्यात प्रश्न पडायला लागतात.

वाघनखांवरुन वाद हा देखील त्याचाच भाग आहे. दुकानांवरील पाट्यांवर कारवाया करणं, आंदोलन करणं हा त्याचाच भाग आहे, असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

मोहम्मद अली रोडवरील पाट्या दिसत नाहीत का?

पण आता हिंदू मुर्ख नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर तुम्ही आता मोहम्मद अली रोड, डोंगरी आणि पाकमोडी भागातल्या फारसी, अरबी आणि ऊर्दू बोर्डांना तुम्ही बघणार नाही. पण घाटकोपरमधील गुजराती बोर्ड तुम्ही बघालं, हे हिंदूंना कळत नाही असं नाही. या असल्या धंद्यांनी मतं मिळत नसतात. याचा परिणाम येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भोगावा लागेल, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT