uddhav.jpg 
मुंबई

रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय जाहीर करणार?

दीनानाथ परब

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावला जाण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आधीच लॉकडाउन लावण्यात आला आहे. आता पुण्यातही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. रविवारपासून पुढील सात दिवसांसाठी पुण्यात काही सेवा पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी याची माहिती दिली. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच वाजता अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक करणार आहेत. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. त्यानंतर रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री सोशल मीडियावरुन राज्यातील जनतेशी संवाद साधतील. मुख्यमंत्री काय बोलणार? काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

लॉकडाउन कोणालाच नकोय. कारण लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते, बेरोजगारी वाढते. काही राजकीय पक्षांनी लॉकडाउनला विरोध दर्शवलाय. शिवसेनेसोबत सत्तेमध्ये सहभागी असलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही लॉकडाउनसाठी अनुकूल नाहीय. तसे त्यांनी संकेतही दिले आहेत. तरीही आज निर्बंधांच्या नावाखाली मिनी लॉकडाउनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT