Maharashtra Congress MLA Sajid Khan Pathan allegedly receives a death threat linked to the Lawrence Bishnoi gang

 

esakal

मुंबई

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

Congress MLA receives death threat : लॉरेन्स गँगने तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे; जाणून घ्या, कोण आहे आमदार?

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Congress MLA Sajid Khan Pathan receives death threat : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहेत. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह व दिग्दर्शक रोहित शेट्टीसह काही कलाकारांना धमक्या दिल्यानंतर आता या गँगने राजकीय नेत्यांना टार्गेट करणं सुरू केल्याचे दिसत आहे. कारण, सध्या हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एका काँग्रेस आमदारानेही लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्यांना धमकी दिल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.  त्यांनी दावा केला आहे की या टोळीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत, तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. तर यावरून त्यांनी राज्य सरकारला जाब विचारला असून, सुरक्षा व्यवस्था कुठे आहे असा सवाल केलाय.

महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी आज (मंगळवार) मुंबईत दावा केला की, त्यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "१७ फेब्रुवारी रोजी मी जेवत असताना अचानक मला एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले आणि म्हणाला, 'आधी मी कोण आहे ते शोधा. ज्याप्रमाणे आम्ही प्रमुख लोकांना मारले आहे, त्याचप्रमाणे जर तुम्ही १० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हालाही मारू.

तर आमदार पठाण पुढे म्हणाले, "मी फक्त एक आमदार आहे, उद्योगपती किंवा करोडपती नाही. मी लोकांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने निवडून आलेला प्रतिनिधी आहे आणि त्यांच्यासाठी काम करतो. तरीही, मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढच नाहीतर धमकीत त्यांनी असेही म्हटले आहे की,  आज नाहीतर उद्या जिथे दिसाल, तिथेच गोळ्या घालू."

यानंतर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी पोलिस तक्रार दाखल करण्याबाबत बोलताना सांगितले की, "मी या प्रकरणात अकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी एफआयआर देखील नोंदवण्यात आला. अकोला पोलिसांनी मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली आहे."

तुम्हाला कोणत्या बातम्या वाचायला आवडतात? एक मिनिटाचा हा सर्वे भरून आम्हाला नक्कीच सांगा.

इथे भरा: https://3ofmdvm6sbw.typeform.com/to/v7pynEzq

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : आदित्य पंचोली विरोधात दाखल अत्याचार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी 28व्यांदा सुनावणी

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT