मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण: ''आता अमेरिका पण निर्णय द्यायला लागली का?'', उपमुख्यमंत्री कडाडले

पूजा विचारे

मुंबई: आता भीमा कोरेगावचा निर्णय पार अमेरिका द्यायला लागली का, आम्ही पण तपास करू शकतो. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निर्दोष लोकांचे हाल होणार नाही. आम्ही काम करणार आहोत, असंही अजित पवार म्हणालेत.

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी संशोधक रोना विल्सन यांना अटक केली. त्यांच्या लॅपटॉपसह घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर २२ महिने आधी आक्षेपार्ह मजकूर पेरण्यात आल्याचा धक्कादायक अहवाल मॅसेच्युसेट्सस्थित अर्सेनेल डिजिटल या कंपनीने प्रसिद्ध केला आहे. याच पार्श्वभूमीवर विल्सन यांनी बुधवारी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
आपल्यासह अन्य आरोपींविरोधातील कारवाईला स्थगिती देण्याची आणि या लॅपटॉपमधील माहितीत फेरफार केल्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्याची मागणी विल्सन यांनी केली आहे. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

दुसरीकडे पुढे अजित पवार म्हणाले की, विधानसभेचं अध्यक्षपदाचा निर्णय बिनविरोध होईल अशी शक्यता आणि आम्ही सगळ्यांशी चर्चा करणार आहे. हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आहे आणि प्रमुख नेते एकत्र आहेत. त्यामुळे या सरकारला कोणताही त्रास नसल्याचंही सांगायला अजित पवार विसरले नाहीत. 

राज्यपालांच्या विमान प्रवासावर अजित पवार म्हणाले

राज्य सरकारनं विमान प्रवासाची परवानगी नाकारल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज विमानातून उतरावे लागले. यासंदर्भात अजित पवार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. 

त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, मला याबद्दल काहीच माहिती नाही, ते राज्याचे राज्यपाल आहेत. राज्यात एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल काही घडलं असेल तर मला आधी माहिती घ्यायला हवी. मी आता मंत्रालयात जाणार आहे. तिथे गेल्यावर मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो.

maharashtra deputy cm ajit pawar reaction on bhima koregaon governor

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे काय? परवानगी मिळणार का?

IND vs SL 1st Test: रिषभ पंतने इतिहास रचला! असे 'शतक' झळकावणारा तो भारताचाच नव्हे, तर आशियातील पहिला फलंदाज ठरला

बाबो! प्राजक्ता माळीनं मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं घर, २८ व्या मजल्यावर आहे फ्लॅट

Marathi News Updates : राहुल गांधी पुण्यात येणार?, पुण्यात जमावबंदी लागू

Ganeshotsav 2026 : सुमारे 9 वर्षांनंतर दुर्मिळ योग! यंदा 10 ऐवजी तब्बल 12 दिवस रंगणार गणेशोत्सव; जाणून घ्या नेमके कारण

SCROLL FOR NEXT