Maharashtra first 8 km long tunnel Samruddhi Mahamarg is ready mumbai Sakal
मुंबई

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रातील पहिला ८ किलोमिटर लांबीचा बोगदा तयार

समृध्दी महामार्गावर पॅकेज १४ नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावरील पॅकेज १४ चे १३ किलोमीटरचे काम ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीने नियोजित वेळेच्या तीन महिन्यापूर्वीच पूर्ण केले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा ८ किलोमीटरचा अत्याधुनिक सुविधा असलेला फायर प्रुफ बोगदा तयार झाला असून, समृद्धीच्या दोन्ही मार्गाच्या टनेलला जोडणारे २६ क्रॉस पॅसेज उभारण्यात आले आहे.

शिवाय बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबई - नागपूर मार्गावर बोगद्यातून वाहनांना बाहेर काढण्यासाठी ५०४ लांबीचा आपत्कालीन मार्ग सुद्धा काढला असून, आपत्कालीन मार्गाने वाहनांना नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पोहचता येणार आहे.

७०१ किलोमीटरच्या नागपूर मुंबई समृध्दी महामार्गावर एकूण १६ पॅकेज आहे. त्याप्रमाणे विविध कंपन्या समृध्दी महामार्ग उभारणीचे काम करत असून, १४ व्या पॅकेजचे ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते.

पिंपरी सद्रोद्दिन - वशाळा बुद्रुक या एकूण १३ किलोमिटर मध्ये २ किलोमिटर उंच पुलाची निर्मिती, ८ किलोमिटर लांबीचा बोगदा आणि तीन किलोमीटर रोड असा एकूण १३ किलोमिटर महामार्गाची निर्मिती वेळेपूर्वीच करून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सुपूर्द करण्यात आल्याचे ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले आहे.

बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी लावण्यात येणाऱ्या सुविधांचे नियंत्रण कंट्रोल रूम मधून करता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही मनुष्यबळाची गरज नसणार आहे. बोगद्यात ३६० डिग्री कॅमेरा, मोबाईल नेटवर्क राहण्यासाठी लिकि केबल यंत्रणा बसवण्यात आली आहे.

तर ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम आणि फायर फायटींग सिस्टिमसह अनेक अत्याधुनिक यंत्रणा स्काडा सिस्टीम सोबत जोडून त्यांचे नियंत्रण कंट्रोल रूम मधून करण्यात येणार असल्याचेही प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

बोगद्यात अशा आहे सुविधा

  • लीकी केबल (मोबाईल नेटवर्क साठी)

  • सीसीटिव्ही ३६० डिग्री

  • फायर अलार्म सिस्टीम

  • पब्लिक अनाउंस सिस्टीम

  • फायर फायटिंग सिस्टीम

  • ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम

  • अक्सेस कंट्रोल सिस्टीम (फायर प्रुफ डोअर)

  • रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम

सर्वाधिक उंच पुलाचीही निर्मिती

समृध्दी महामार्गाच्या १४ व्या पॅकेज निर्मितीमध्ये राज्यातील सर्वाधिक मोठा लांबी आणि रुंदीचा बोगदा आणि त्यानंतर सर्वाधिक ६० मीटर उंचीचा पुलाची निर्मिती सुद्धा याच प्रकल्पात केली आहे. एकूण १.२९७ किलोमीटरचा पुल आहे. संपूर्ण फॉरेस्ट झोन असलेल्या डोंगर दर्यांमध्ये उंच पुलाची जाग्यावरच निर्मिती केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

६० डिग्री तापमानाची फायर सिस्टीम घेणार दखल

८ किलोमिटर लांबीच्या या बोगद्यात अग्निरोधक यंत्रणेची सर्वाधिक काळजी घेण्यात आली आहे. ६० डिग्री पेक्षा बोगद्यात तापमान वाढल्यास ऑटोमॅटिक हाय प्रेशर मिस्ट सिस्टीम ऑटोमॅटिक सुरू होणार आहे. त्यामुळे बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीतही वाहतूकदारांना सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा मिळणार आहे.

बोगद्याला आपत्कालीन क्रॉस पॅसेज

लांबीचे मोठा असलेल्या बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबई नागपूर महामार्गावरील बोगद्याला जोडून ५०४ लांबीचा एक आपत्कालीन मार्ग तयार केला आहे. आंगणवाडी, फुगाळे, टोकरखंड, वशाळा गावाला जोडून पुढे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT