मुंबई

सरकारचं एक पाऊल मागे, सचिन वाझे यांच्याबाबत गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत 'मोठी' घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलंच गाजतंय. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अशात आजही विरोधकांकडून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सरकारला चांगलंच घेरण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली केली जाईल असं  विधानपरिषदेत घोषित केलं.

गृहमंत्री अनिल देशमुख गृयांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचेही समजते आहे. 

महत्त्वाची बातमी : पाण्याखालून होणार घातक 'वार', सायलंट किलर 'INS करंज' नौदलात दाखल
 
विधानपरिषदेत काय म्हणालेत अनिल देशमुख  

"या प्रकरणात जो कुणी दोषी असेल, मग ते सचिन वाझे असो किंवा अजून कुणीही असो, महाराष्ट्र सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. जो दोषी आहे त्यावर महाराष्ट्र शासन कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांकडून सातत्याने सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होतेय. मी त्यांना सांगतोय की याबाबत आता चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. सचिन वाझे सध्या ज्या ठिकाणी सध्या क्राईम ब्रांचमध्ये काम करत आहेत, त्यांना त्या ठिकाणावरून बाजूला काढण्याची मागणी कालपासून केली जातेय. त्याप्रमाणे सचिन वाझे यांना सध्या क्राईम ब्रांचमधून काढून दुसरीकडे हलवण्यात येणार आहे" 

वाझेंच्या अटकेची मागणी

दरम्यान विरोधकांकडून आता वाझेंच्या अटकेची मागणी केली जातेय. वाझे यांचे तात्काळ निलंबन व्हावं अशीही मागणी दोन्ही सभागृहात विरोधकांकडून केली जात आहे. 

maharashtra government on back foot anil deshmukh announces transfer of sachin vaaze 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT