मुंबई

राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लागू राहणार मिशन बिगिन अगेन अंतर्गातील सर्व नियम, नियमावली जारी

सुमित बागुल

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढलीये. अशात कोरोनाच्या या नव्या प्रकाराने आता भारतात शिरकाव केला आहे. एकीकडे नवीन वर्ष येतंय, नागरिकांमध्ये उत्साह आहे. अशात मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडणे पसंत करतात, एकमेकांना भेटतात. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  

राज्यात मिशन बिगिनची सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार आता ३१ डिसेंबरपर्यंतचे नियम आता ३१ जानेवारीपर्यंत लागू असणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत जे नियम सरकारने घालून दिले आहेत ते सर्व नियम पुढे ३१ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखिल ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी पुन्हा एकदा संवाद साधला. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणालेत... 

  • मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह यासारख्या ठिकाणीही ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये
  • कोरोनाचं संकट अजूनही उभं आह हे लक्षात ठेवून नववर्ष अत्यंत साधेपणाने आणि शांततेत साजरं करा 
  • ११ वाजता हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट, बार्स बंद होतील
  • तुम्हाला बाहेर मित्राकडे जायचं आहे तर अकरानंतर जाऊ शकता, मात्र नियमांचे पालन करा 
  • सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये
  • राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं व्यवस्थित पालन करावं
  • राज्यातील हिल स्टेशनला गर्दी होतेय, तिथं नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Maharashtra Government extends lockdown restrictions in the state till 31st January 2021, to prevent the spread of COVID19

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT