corona vaccine sakal media
मुंबई

दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासठी व्यापारी सज्ज, पण...

लायसन्स राज वाढण्याची व्यापाऱ्यांना भीती

कृष्ण जोशी

मुंबई : राज्यातील हॉटेल, दुकाने, मॉल आदी व्यापारी केंद्रे (malls hotel shop) रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी (permission) देण्याच्या सरकारी निर्णयाचे (government decision) स्वागत करतानाच तेथील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी (employee vaccination) राज्य सरकारने (Maharashtra government) लशी पुरवाव्यात, अशी मागणीही व्यापारी संघटनांनी (traders union) केली आहे.

नुकताच राज्य सरकारने वरील निर्णय जाहीर करताना दोन लशी घेतलेल्यांना उपनगरी लोकलप्रवाससही खुला केला आहे. दुकाने, हॉटेल, मॉल येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे. म्हणजेच त्यांनी दोनही लशी घेऊन 14 दिवस पूर्ण झाले असले पाहिजेत, अशीही अट सरकारने घातली आहे. या अटीमुळे पुन्हा अधिकाऱ्यांचे लायसन्स राज वाढेल, अशी भीती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात 15 ऑगस्टपासून दुकाने, मॉल, उपहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवताना कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून त्यांची प्रमाणपत्रेही अधिकाऱ्यांच्या तपासणीसाठी तयार ठेवावीत, असे सरकारच्या आदेशात म्हटले आहे. मात्र अजूनही आपल्याकडे लसीकरण वेग घेत नसल्याने अशा निर्णयामुळे भ्रष्टाचार व इन्स्पेक्टर राज वाढेल. तसेच अजूनही लशी मिळत नसल्याने या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठाच गोंधळ होईल, असेही फेडरेशनने दाखवून दिले आहे. आम्ही दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्वरेने करण्यास तयार आहोत, पण त्यासाठीच्या लशी सरकारने उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा लशी उपलब्ध होईपर्यंत ही अट तहकूब ठेवावी, अशीही मागणी फेडरेशनने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT