मुंबई

1 सप्टेंबरनंतर कसा असेल लॉकडाऊन?, बुधवारी ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

पूजा विचारे

मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरस देशभरात तळं ठोकून आहे. सर्वत्र कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी व्हावा यासाठी राज्य सरकारनं विविध पातळीवर प्रयत्न केले. त्यातच दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून काही प्रमाणात अटी शिथिल करण्यात आल्या. त्यातच आता ऑगस्ट महिना ही संपत आला आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन कशाप्रकारे असेल अशी विचारणा होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

लॉकडाऊन संदर्भात येत्या बुधवारी मुंबईत महाविकास आघाडी सरकारची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लॉकडाऊन या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्याबाहेर आणि अंतर्गत प्रवासी वाहतूक, वस्तूंची ने-आण आणि अन्य स्वरूपाच्या वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. मार्च महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातंर्गत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या वाहतूक बंदच राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर केंद्रानं राज्यातली अंतर्गत वाहतूक सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे २० ऑगस्टनंतर राज्यात एसटी बससेवा सुरु करण्यात आली. तब्बल ५ महिन्यांच्या ब्रेकनंतर एसटी बसची सुविधा नागरिकांसाठी खुली झाली. मात्र खासगी वाहनांसाठी ई पास अजूनही कायम आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनचे बहुतांश निर्णय मागे घेऊन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. येत्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊन प्रश्नी विचारविनिमय होऊन निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसंच बुधवारी होणाऱ्या बैठकीत खासगी वाहनांना ई पास कायम ठेवायचा की, नाही याबद्दल निर्णय होण्याचीही शक्यता आहे. 

मुंबईची लाइफलाइन असलेली उपनगरी लोकलसेवा सध्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहे.  इतरांसाठी उपनगरी लोकलसेवा खुली केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, अशी प्रशासनाला भीती वाटते.  त्यामुळे लोकल सेवा सुरू करायची तर नेमके काय करावे लागले, याचीही चर्चा या बैठकीत केली जाणार आहे. 

बुधवारी मंत्रिमंडळात राज्यातील लॉकडाऊन संपुष्टात आणण्यावर चर्चा होईल. मात्र निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबर म्हणजे गणेश विसर्जनानंतर होईल. या उत्सवात होणारी गर्दी टाळण्याचा यामागे उद्देश असल्याचे कळते. केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराज्यीय आणि राज्यातंर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याच्या संदर्भातील पत्राची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून खासगी वाहनांवरील ई-पाससक्ती हटवण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सूतोवाच केले. 

राज्यात वाहतूक सेवा, मॉल, हॉटेल्स सुरू झाले आहे. मात्र अजूनही चित्रपटगृहे, शाळा, रेस्टॉरंट, सार्वजनिक उद्याने, धार्मिक स्थळे बंद आहे. तसंच  लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा अंशत: सुरू आहे. त्यामुळे एकीकडे सार्वजनिक ठिकाणं खुली केली जात आहे पण काही ठिकाणी नियम आणि अटी कायम आहे, त्यामुळे नागरिकांमधील नाराजी कायम आहे.

Maharashtra government Meeting on wednesday for decision after 1 september lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

दुर्दैवी ! बिल्डिंगवरून पडल्याने 37 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव

Latest Marathi News Updates Live : सर आम्हाला सोडून जाऊ नका, विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

SCROLL FOR NEXT