wine esakal
मुंबई

किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार? मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात येणाऱ्या काळात किराणामालाच्या दुकानात वाईन मिळणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणाच्या दुकानांमध्ये वाईनची विक्री केली जाऊ शकते.

त्यामुळे जर तुम्ही किराणा दुकानात गहू, तांदुळ किंवा इतर वस्तू घेण्यास गेलात आणि तिथे तुम्हाला वाईन दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. या निर्णयाबाबत राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे. (Maharashtra Government planning to sale wine in grocery shop)

राज्य सरकारने याबाबत जर अध्यदेश काढला तर, तुम्हाल यापुढील काळात किराणा, दुकान, बेकरी आदींसह डिपार्टमेंटल स्टोअरमधूनदेखील तुम्ही वाईन खरेदी करू शकणार आहात. मात्र अशा प्रकारची वाईन खरेदी करताना एका लीटरमागे 10 रूपये अबकारी कर आकरण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात वाईनची विक्री केल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 5 कोटींचा महसूल जमा होणार असून वाईनची विक्री किती प्रमाणात होते याची माहिती सरकारला मिळण्यास मदत होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर 300 टकक्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत. तुर्तास, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून, लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही दर अशाच प्रकारे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT