uddhav thackeray  file photo
मुंबई

महाराष्ट्रात कुठल्या क्षेत्रातल्या कामगारांना किती आर्थिक मदत देणार समजून घ्या....

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

दीनानाथ परब

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. 'ब्रेक दि चेन' अंतर्गत त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध तुम्हाला लॉकडाउन सदृश्य वाटू शकतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आता कलम १४४ लागू झाले आहे. पुढचे १५ दिवस कामाशिवाय अनावश्यक कोणालाही, कुठेही फिरता येणार नाही. राज्यात संचारबंदी लागू असेल. या निर्बंधांचा अनेकांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे समाजातील काही घटकांना आर्थिक मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समाजातील काही घटकांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत खालीलप्रमाणे आहे.

- ७ कोटी लोकांना तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देणार.

- शिवभोजन योजनेत दहा रुपयांची थाळी 5 रुपयांना केली होती. आता मोफत देण्यात येणार.

- रोजी मंदावणार पण रोटी थांबू देत नाहीय.

- राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 1500 रुपये अर्थसहाय्य देणार. १२ लाख लाभार्थी आहेत.

- नोंदणीकृती घरगुती कामगारांना, अधिकृत फेरीवाल्याना १५०० रुपये देत आहोत. पाच लाख लाभार्थी आहेत.

- परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये देत आहोत. १२ लाख लाभार्थी आहेत.

- खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासी कुटुंबांना २ हजार रुपये आर्थिक सहाय्य. १२ लाख लाभार्थी.

- पाच हजार ४०० कोटी रुपये आधार देण्यासाठी बाजूला काढून ठेवला आहे.

- सध्याच्या घडीला दररोज ४० ते ५० हजारे इंजेक्शन वापरतोय. हीच परिस्थिती कायम राहिली तर एक लाख रेमडेसिवीर इंजेक्शन लागतील.

- बंधन एकतर्फी टाकलेली नाही. प्राण वाचवण हा बंधन टाकण्यामागचा उद्देश.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT