मुंबई

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउन अटळ, पण... - मुंबईचे पालकमंत्री

विराज भागवत

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातल्याचं दिसत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रूग्ण वाढत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये रूग्ण पॉझिटिव्ह येण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत रूग्णांच्या साखळीचा विचार करायचा झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर ल़ॉकडाउन अटळ आहे. त्याशिवाय ही कोरोना साखळी तोडता येणार नाही, असं स्पष्ट मत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी व्यक्त केलं. मात्र, लॉकडाउन लावायचं ठरल्यास काहीही झालं तरी अचानक लॉकडाउन लावला जाणार नाही. लोकांना विश्वासात घेऊन आणि पुरेसा वेळ देऊन मगच लॉकडाउन लावण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला.

"सध्या देशात रोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एका दिवसात लाखाहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह आले तर त्यातील अंदाजे ६० हजार रूग्ण हे आपल्या राज्यातील असतात. सर्वत्र कोरोना पसरतोय. पण आजूबाजूला तितके रूग्ण नाहीत, मग आपल्याच राज्यात इतकी रूग्णवाढ का होतेय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन अटळ आहे", अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

"ठाकरे सरकारने आतापर्यंत कोणताही निर्णय अचानक घेतलेला नाही. आधीपासीन सगळ्यांना सांगितलं जातंय की गर्दी टाळा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, पण लोक ऐकत नाहीत. त्यामुळे आम्ही सुरूवातीला नाईट कर्फ्यू लावला. त्यानंतर वीकेंड लॉकडाउनची घोषणा केली. नंतर दिवसा जमावबंदी केली. आम्ही विविध निर्बंध आणून लोकांना समज देण्याचा नीट प्रयत्न केला आहे. लोकांच्यात मनात लॉकडउन लागल्यास भीती निर्माण होऊ नये म्हणून अनेक उपाय करून झाले आहे. आता लोकांना विश्वासात घेऊन, ठराविक वेळ देऊन मग लॉकडाउन लावणं असाच पर्याय सध्या दिसतो आहे", असं पालकमंत्री शेख यांनी सांगितलं.

"पंतप्रधान मोदी म्हणतात की लस महोत्सव साजरा करा. सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. लसीचा पुरवठा होत नाही. मग लस महोत्सव कसा साजरा करणार? आमची अशी मागणी होती की जिथे रूग्ण वाढतायत, तिथे वयाचा प्रतिबंध घालू नका. गुजरातमध्ये जसे काही ठिकाणी तरूणानांही लस दिली, तसंच आमच्या राज्यात करू द्या. पण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आताही आमची अशीच मागणी आहे की जिथे रूग्ण वाढत आहेत तिथे लस जास्त प्रमाणात पुरवा", अशी मागणूी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT