lockdown Google
मुंबई

महाराष्ट्रात लॉकडाउन मे अखेरपर्यंत वाढणार, मंत्र्याने दिले संकेत

काय म्हटलय या मंत्र्याने?

दीनानाथ परब

मुंबई: राज्यात १५ मे पर्यंत लागू असलेले लॉकडाउन सदृश्य निर्बंध (Maharashtra lockdown) महिनाअखेरपर्यंत वाढू शकतात. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये दररोजची कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या कमी होतेय. काही भागांमध्ये रुग्ण संख्या स्थिर झाली असली, तरी अजून कमी झालेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. (Maharashtra lockdown likely to extend till May end)

राज्यातील अनेक भागात रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनेक घटकांकडून निर्बंध शिथील करण्याची मागणी होत आहे. पण राज्य सरकारकडून इतक्यात निर्बंध शिथील करण्याची शक्यता कमी आहे. सध्या असलेले निर्बंध राज्य सरकार महिनाअखेरपर्यंत कायम ठेवेल असे एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. या मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही.

"राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढ कमी होत असल्याचे दिसून आले आहे. पण हा राज्याचा एक तृतीयांश भाग आहे. अन्य दोन-तृतीयांश जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या स्थिर आहे किंवा वाढत आहे. निर्बंध शिथील केले, तर रुग्णसंख्या पुन्हा वाढेल" असे या मंत्र्याने सांगितले.

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतरच निर्बंधांमध्ये शिथीलता देता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाउन संदर्भात चर्चा होईल. त्यानंतर पुढे अंतिम निर्णय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT