Viral Tweet Sakal
मुंबई

Viral Tweet : मराठी माणसं वडापाव शिवाय गाणे पण बनवतात का? 'त्या' ट्वीटवरून सोशल मीडियावर राडा

या पोस्टवरून ट्वीटरवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई हे मराठी भाषिकांचे शहर मानले जात असले तरी मराठी भाषिकांच्या संख्येपेक्षा मुंबईत हिंदी भाषिकांची संख्याच जास्त होत आहे. उत्तरप्रदेश, गुजराती, बिहारी, राजस्थानी येथील नागरिकांची संख्या मुंबईत कमालीची आहे. तर अनेकदा परराज्यातील लोकांकडून मराठी माणसांवर अन्याय झाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील.

सध्या एका बिहारी व्यक्तीने थेट मराठी माणसांच्या वर्मावर घाव घातला असून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. @Khesari या ट्वीटर अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली असून त्यामध्ये "मराठी माणसं वडापाव शिवाय गाणे पण बनवतात का?" असा बोचरा सवाल करण्यात आला आहे.

या पोस्टवरून ट्वीटरवर वातावरण तापलं आहे. या व्यक्तीने त्याच्या ट्वीटर बायोमध्ये 'प्राउड बिहारी', 'कट्टर आरजेडी समर्थक' असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, @MSDianAbhiii या अकाऊंटवरून "मराठीतील आत्तापर्यंतचे सर्वांत उत्कृष्ट गाणं कोणतं?" अशी पोस्ट करण्यात आली होती. पण त्याला रिप्लाय करत खेसरी या अकाऊंटवरून ही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्वीटरवर अनेकांनी या व्यक्तीला रिपोर्ट करत ब्लॉक केलं आहे.

"महाराष्ट्रात राहून मराठी माणसांविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, आम्ही तुमच्या राज्याला पोसतो, आमच्या टॅक्सवर तुम्ही जगता, हाच वडापाव खाऊन तू जगतोस की" अशा संतप्त प्रतिक्रिया मराठी नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT