Congress Assembly Session Sakal
मुंबई

विधिमंडळात सत्ताधारी-विरोधकांत धक्काबुक्की; काँग्रेसचा अलिप्त पवित्रा

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातले महेश शिंदे एकमेकांसमोर भिडले.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस गाजला तो म्हणजे सत्ताधारी-विरोधकांमध्ये झालेल्या राड्यावरुन. सत्ताधारी आणि विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये दोन्ही गटांत चांगलीच धक्काबुक्की झाली. महेश शिंदे आणि अमोल मिटकरी हे दोन आमदार एकमेकांमध्ये भिडले आहेत.

काल संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याने त्याबद्दल अधिवेशनात आवाज उठवण्याचं ठरलं. त्याप्रमाणे सकाळी साडे दहा वाजता विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमण्याचं आणि आंदोलन करण्याचं ठरल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. त्याप्रमाणे मविआचे अनेक नेते या पायऱ्यावर दिसून आले. त्यानंतर दोन्ही गटांत राडा झाला, त्यावर प्रतिक्रिया झाल्या, पण यात काँग्रेस कुठेच दिसून आलं नाही.

काँग्रेसचे आमदार या सगळ्यात कुठे गायब झाले? सकाळी आंदोलन करण्याचं ठरलेलं असतानाही काँग्रेस नेते आले का नाहीत? आले असतील तर या गोंधळात ते कुठे होते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. येत्या ४ सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु होत आहे. राहुल गांधी या यात्रेच्या अध्यक्षस्थानी असतील. दरम्यान, काँग्रेसच्या अशा प्रकारे गायब होण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Light Bill Update: बापरे... ऑगस्टचं वीज बिल वाढणार! महावितरणचा घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही झटका; किती वाढणार बिल?

Sports Governance: भारतीय टेबल टेनिस महासंघ निलंबित; प्रशासनात मोठ्या त्रुटी असल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालयाची कारवाई

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी, अमित शहा संसदेत, लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात

Mumbai News: विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! इमारतीला आग; चिमुरड्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT