maharashtra monsoon popular tourist attraction bhushi dam overflows heavy rains lonavala sakal
मुंबई

Bhushi Dam Overflows : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण 'ओव्हर फ्लो', लोणावळा परिसरात...

पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण भरल्याने लोणावळेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : लोणावळा परिसरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू असून जोरदार पावसाने लोणावळेकरांना चांगलेच झोडपले. दरम्यान परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण शनिवारी सकाळी ओसंडून वाहू लागले.

धरण भरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांसह पर्यटकांनी सांडव्यावर बसून भिजण्याचा आनंद लुटला. शनिवारी (ता. ०१) लोणावळ्यात सकाळी आठ वाजेपर्यंत १५८ मिमी तर एकूण ६९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण भरल्याने लोणावळेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धरणाची साठवण क्षमता ०.५० दशलक्ष घनमिटर असून गेल्या वर्षी २८ जूनला भरले होते.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, लायन्स पॉइंट, आतवण तसेच जांभुळणे भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाची साठवण क्षमता फारशी मोठी नसल्याने दोन दिवसांतच धरण भरून वाहू लागले आहे.

धरण भरल्याने भुशी परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

एरवी पावसाचा आनंद लुटणारे लोणावळेकर मात्र पावसाचा जोर सुरू असताना घराबाहेर पडेनासे झाले. लोणावळा परिसरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढेनाले खळाळून वाहू लागले असून इंद्रायणी नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे.

लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वळवण धरण, तुंगार्ली तसेच लोणावळा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. डोंगर-दऱ्यांतील धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांना खुणावत आहे. लोणावळ्यासह खंडाळा,

कुसगाव बु., औंढे - औंढोली, कार्ला, भाजे, वेहेरगाव परिसरालाही जोरदार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे द्रुतगती मार्गासह महामार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT