Mantralaya sakal media
मुंबई

Mantralaya : मंत्रालयातील इंटरनेट सेवा तासाभरापासून ठप्प; कामं खोळंबली

सकाळ डिजिटल टीम

Internet Service Down In Mantralaya : मुंबईत असणाऱ्या मंत्रालयातील इंटरनेट सेवा गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक कामं खोळंबली असून, विविद कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना पास मिळण्यासाठी वाट बघावी लागत आहे.

दरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे मंत्रालयातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या राजायातील नागरिकांना प्रवेश पास मिलवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तासाभरापासून ही सेवा विस्कळीत झाली असून याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने मंत्रालयाबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या असून, अनेकांचा यामुळे खोळंबा झाला आहे.

मंत्रालयात कोणत्याही कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्वात प्रथम पास काढणे अनिवार्य असते. मात्र, गेल्या तासाभरापासून येथील इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी गार्डन गेट येथे पास वितरित केले जातात. परंतु, येथील इंटरनेट सेवा काही तांत्रिक विघाडामुळे बंद पडली असून, सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT