Women's police hand injured  
मुंबई

महिला पोलिसांचे कामाचे तास बदलणार, महासंचालकांच्या सूचना जारी

सकाळ डिजिटल टीम

महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. येणाऱ्या काळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १२ हून ८ तास करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचलक संजय पांडे यांनी यासंदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत. (Sanjay Pande)

सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ८ तास ड्युटीचा उपक्रम सुरू करण्याचे पांडे यांनी आदेश दिले आहेत. यानंतर काही दिवसात अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलांवर कामाची आणि कौटुंबिक जबाबदारी देखील असते. (Police working hours)

यामुळे त्यांची बरीच दमछाक होते. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये आजारी पडण्याचं अन्य व्याधींनी ग्रास्त होण्याचं प्रमाण वाढतं. हे टाळण्यासाठी गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव आला होता. त्यावर पोलीस महासंचालकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे त्याची ८ तास ड्युटी केल्यास महिला पोलीस कर्मचारी गैरहजर राहणे, आजारी पडणे हे प्रमाण कमी होईल, अशी धारणा यामागे आहे. मात्र सण उत्सव काळात महिला कर्मचाऱ्यांच्या तासाबाबत वरिष्ठांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

Asha Bhosle Video: "मला हे दत्त गुरु दिसले...." ; आशा भोसलेंचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, भावस्पर्शी स्वराने मन भारावलं

Crispy Dosa Secret Reveal: कुरकुरीत डोशामागचं विज्ञान उलगडलं! ‘या’ एका टेस्टमुळे बनतो परफेक्ट डोसा

SCROLL FOR NEXT