Subhash Desai and Prasad Lad Sakal
मुंबई

प्रकल्प महाराष्ट्र बाहेर का गेले याची जंत्री आम्ही मांडू - प्रसाद लाड

प्रसाद लाड यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध करून सुभाष देसाई यांच्यावर तसेच शिवसेनेवर टीका केली.

सकाळ वृत्तसेवा

प्रसाद लाड यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध करून सुभाष देसाई यांच्यावर तसेच शिवसेनेवर टीका केली.

मुंबई - टाटा एअरबस प्रकल्पाच्या महाराष्ट्रात वाटाघाटी सुरू असताना हे प्रकल्प महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवले, त्यांचे एजंट कोण होते, भूषण देसाई कोण होते, दुबईसह कोठे बैठका होत होत्या, रेडीरेकनर भाव कसा मागितला जात होता, याचे उत्तर सुभाष देसाई यांनी द्यावे अशी बोचरी टीका भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे.

सुभाष देसाई हे जेष्ठ आणि वयस्कर नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र ते सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत गेले तर त्यांच्याविरुद्ध असलेले पुरावे, त्यांची कामे, प्रकल्प महाराष्ट्र बाहेर का गेले याची जंत्री आम्ही मांडू एवढेच मी देसाई यांना सांगू इच्छितो, असा इशाराही लाड यांनी दिला आहे.

लाड यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध करून देसाई यांच्यावर तसेच शिवसेनेवर या संदर्भात टीका केली आहे. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यासंदर्भात महाविकास आघाडी काळातील शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फडणवीस -शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्याला लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीचे नेते प्रत्येक गोष्टीत ज्या प्रकारे फडणवीस - शिंदे सरकारवर टीका करतात ते अयोग्य आहे. टाटा एअरबस प्रकल्प २१ सप्टेंबर २०२१ रोजी गुजरातला गेला. अशा स्थितीत भाजप सरकारमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असे आरोप करणे अयोग्य आहे. त्याकाळात सुभाष देसाई उद्योगमंत्री तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या नऊ-दहा महिन्यांच्या काळात प्रकल्प महाराष्ट्रात रहावा यासाठी त्यांनी काय केले हे देसाई यांनी सांगावे. या संदर्भातील बैठका कोठे होत होत्या. फायली कशा फिरत होत्या याचे उत्तर देसाई यांनी द्यावे, असेही लाड यांनी सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT