मुंबई : डम्पिंग ग्राऊंडवर जाळलेल्या कचऱ्यानेही वायू प्रदूषणात भर होत असल्याचे आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ते जाळल्यानंतर विषारी वायू हवेत मिसळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे आवाजाच्या पातळीसारखा वायू प्रदूषणाच्या पातळीचाही अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत आवाज फाउंडेशनने व्यक्त केले.
दरम्यान, 22 डिसेंबर या दिवशी आयसीएमआरने जाहिर केलेल्या अहवालानुसार, वायू-प्रदूषण संबंधित मृत्यूंमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमाकांवर असून 1.4 लाख मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
आवाज फाउंडेशन 2016 पासून डंप्मिंग ग्राऊंडमध्ये जाळलेल्या कचऱ्यातून तयार होणाऱ्या प्रदूषणावर काम करत आहे. त्यानुसार, 2020 मध्ये ही मुंबईसह लगतच्या परिसरातील डंम्पिंग ग्राऊंडमध्ये जाळणाऱ्या कचऱ्याचा आढावा घेण्यात आला. मुंबई-अलिबाग रोडलगत पनवेल, धरमतर, पोयनाड, चोंडी आणि इतर कचरा जाळण्याच्या असंख्य ठिकाणे, अलिबाग शहर केंद्र, भिवंडी, काल्हेर आणि ठाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणांची माहिती आवाज फाऊंडेशनने नोंदवली होती. मात्र, विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी मनपा यंत्रणा नसल्यामुळे कचरा महामार्ग व रस्त्याच्या कडेला ढिगाने पडलेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दिसतो. कचऱ्याला जाळणे ही सर्वात सोपी विल्हेवाट करण्याची पद्धत आहे. यातून बऱ्याचदा डंम्पिंग ग्राउंडला आगी ही लागतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते.
आवाज फाऊंडेशनने जानेवारी ते डिसेंबर महिन्यातही या डंम्पिंग ग्राऊंडचा आढावा घेतला. त्यात काही ठिकाणी ऐक्यूआया पीएम 2.5 मोजला गेला. शिवाय, कचरा जाळणे ही प्रक्रिया प्रदूषणाशी थेट संबंधित आहे. भिवंडी येथील डंम्पिग ग्राऊंडमध्ये 2.5 पीएम ऐक्यूआय नोंदवला गेला. शिवाय, हा कचरा रस्त्यावर ही पसरलेला आढळला. भिवंडी येथे पीएम 2.5 तरंगत्या धुलीकणात 1 मिनिटांच्या अंतराने 612 मायक्रॉन दर घनमीटर एवढे मोजमाप आले, तर पनवेल नाका येथे 182ग / मायक्रॉन दर घनमीटर नोंदले गेले. धरमतरमध्ये 181ग / मायक्रॉन दर घनमीटर मोजमाप नोंदवले गेले.
दरम्यान, वायू-प्रदूषण संबंधित मृत्यूंमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमाकांवर आहे. या कचराकुंड्यांमध्ये मिश्रित बायो-मास आणि प्लास्टिकचा समावेश आहे आणि स्थानिक कचरा जाळण्याच्या घटना अधिक आहेत.
प्लास्टिक जाळल्यामुळे अनेक विषारी वायू बाहेर पडतात. यामुळे श्वसन रोग, कर्करोग, यकृत निकामी होणे आणि इतर विकार होऊ शकतात. आयसीएमआर अहवालात महाराष्ट्रातील अकाली वायू प्रदूषण संबंधित मृत्यूंबद्दल धक्कादायक माहिती आहे, एकूण मृत्यूंपैकी 16.7 % लोकांचा मृत्यू वायु प्रदूषणासंबंधित विकारांमुळे झाले आहेत.
मुंबई बाहेरील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जातो. याचा परिणाम आरोग्यावर होतो. कचरा जाळल्याच्या ठिकाणी स्थानिक लोकांना त्याचा परिणाम जास्त होतो. जाळलेल्या कचर्यातून कर्करोग होतो. जिथे कचरा जाळला जातो तिथली हवा कधीच चांगली असू शकत नाही. त्याचा परिणाम तिथल्या स्थानिकांना होतो. कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सुमायरा अब्दुलली,
आवाज फाउंडेशन, सदस्य, क्लीन एअर कलेक्टिव
Maharashtra ranks second in air pollution deaths Waste incinerated in the dumping ground also contributes to the pollution
-----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.