Career Camp
Career Camp sakal
मुंबई

Career Opportunity : तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला करिअरच्या संधीचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी कोणत्या आहे, या संदर्भात कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा 250 वा टप्पा आज मुंबईत पार पडला. मुलुंड येथील शासकीय आयटीआयच्या माध्यमातून आज महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते.

या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य संजय गोरे, उपप्राचार्य संदीप परदेशी तसेच प्रदीप दुर्गे आदी अधिकारी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना करिअरची संधी या संदर्भात माहिती उपलब्ध व्हावी म्हणून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्फत राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांच्या आयोजन केले जात आहे. याच माध्यमातून आज मुलुंड येथील शासकीय आयटीआयच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 250 वाटप पूर्ण झाला उर्वरित शिबिरे ही लवकरच पूर्ण होणार आहेत.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या करिअर संदर्भात अनेकदा संभ्रम असतो. दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यात २८८ मतदार संघात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर म्हणजेच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी संदर्भात शिबिरे आयोजित करत असून आत्तापर्यंत 250 शिबिरे पूर्ण झाले आहेत.

या शिबिरांमध्ये तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तब्बल १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी क्युआरकोडच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. या शिबिराचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत असून त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

आम्हाला कौशल्य युक्त महाराष्ट्र आणि रोजगार युक्त महाराष्ट्र ही संकल्पना राज्यात पूर्णत्वास आणायची असून त्या दिशेने पावले पडत आहेत यामुळेच आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह पाचशे रूपये स्टायपंड, तसेच ॲरेंटशिप करताना ५ हजार रूपये दिले जात आहेत. त्यामुळे कौशल्ययुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत असल्याचेही लोढा म्हणाले.

आयटीआयमध्ये एरोनेटिक स्ट्रक्चरल फिटर, ड्रोन टेक्निशियन असे नव्याने ट्रेड यावषी सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी अशा ट्रेडमुळे कौशल्याच्या क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत. तर दुसरीकडे आयटीआयचे अपग्रेडेशन होत असल्याने खूप सारे बदल होत असल्याचे लोढा म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT