मुंबई

ऑक्सिमीटर विकत घेताय..?? मग त्याआधी ही बातमी वाचाच

ग्राहकांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेने ऑक्सिजनबद्दल दिली महत्त्वाची माहिती

विराज भागवत

ग्राहकांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेने ऑक्सिजनबद्दल दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: गेल्या दीड वर्षापासून भारताला कोरोनाने (Coronavirus In India) ग्रासलंय. जगभरात तर हा कालावधी दोन वर्षांपेक्षाही अधिक आहे. कोरोनाच्या निमित्ताने भारतीय जनतेच्या अनेक नवनवीन शब्द पडले. क्वारंटाईन (Quarantine) असो किंवा रेमडेसिव्हिर (Remdesivir) असो... कोरोनाच्या निमित्ताने दुर्दैवाने भारतीयांना या शब्दांची तोंडओळख करून घ्यावीच लागली. याच कोरोनामुळे सध्या सर्व भारतीयांच्या अगदी परिचयाचा असलेला आणखी एक शब्द म्हणजे ऑक्सिमीटर (Oximeter)... शरिरातील ऑक्सिजनचे (Oxygen Percentage) प्रमाण मोजणारं हे यंत्र हल्ली सर्रास कुठेही पाहायला मिळतं. खासगी ऑफिसेस पासून ते अगदी मॉलच्या पार्किंग लॉटपर्यंत सर्वत्र या ऑक्सिमीटरची हजेरी असते. ऑक्सिमीटर वर तुमच्या शरिरातील ऑक्सिजन किती आहे हे पाहून तुम्हाला आस्थापनाच्या (Private Offices) आत प्रवेश द्यायचा की नाही, हे ठरवलं जातं. पण जर, हा ऑक्सिमीटरच सदोष (Poor Quality) किंवा खराब असेल तर??? महाराष्ट्रात (Maharashtra) ही गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच घडू शकते. कारण महाराष्ट्रातील १५ टक्के ऑक्सिमीटर हे निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Maharashtra Study finds 15 percent oximeters in Mumbai thane and other area are of poor quality technically not sound)

The Consumer Guidance Society of India (CGSI) नावाच्या ग्राहक हक्कांसर्भातील NGOने गुरूवारी एका अभ्यासाच्या आधारावरून माहिती प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की सध्या मार्केटमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या ४० ऑक्सिमीटर पैकी किमान १५ टक्के किंवा किमान ६ ऑक्सिमीटर हे सदोष आहेत. ऑक्सिमीटर बनवण्यासाठीच्या निकषांसाठी ते पात्र ठरत नाहीत. तसेच, इतर काही ऑक्सिमीटर हे भिन्न किमतीचे असले तरी ते नीट पॅकेजिंग करून विकले जात नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, या पल्स-ऑक्सिमीटरची महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर भागात विक्री केली जात आहे.

Pulse Oximeter

CGSI चे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. मनोहर कामत म्हणाले की, आम्ही आमच्या अभ्यासासाठी काही पल्स ऑक्सिमीटरची चाचणी घेतली. त्यातील ४० पल्स ऑक्सिमीटर हे वैद्यकीय निकषांच्या चौकटीत बसत नाही. ठरवून दिलेले मापदंड त्यांच्याकडून पाळले गेलेले नाहीत. तर, इतर किंवा उर्वरित ८५ टक्के पल्स-ऑक्सिमीटर मापदंडानुसार तयार केलेले असले तरी त्यांच्यात इतर कोणता ना कोणता दोष आढळून आला आहे. ऑक्सिमीटरमधील सदोषपणा हा खूपच घातक आहे. असे ऑक्सिमीटर एखाद्या माणसाला ऑक्सिजन लेव्हल कमी असतानाही काहीच संकेत देणार नाहीत. तर एखादा माणूस ठणठणीत असेल तरीही त्याला कमी ऑक्सिजन लेव्हल दाखवून घाबरवून टाकू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT