मुंबई

"महाराष्ट्राचं चित्र बदलतंय, बदलाला सर्वसामान्य लोकांचा मोठा पाठिंबा"; निकालानंतर शरद पवारांचं सूचक विधान

सुमित बागुल

मुंबई : महाविकास आघाडीच्या रूपाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने बाजी मारली आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. निकालांवरील शरद पवारांची प्रतिक्रिया अत्यंत सूचक होती.  

पुणे विभागाचा निकाल यापूर्वी आम्हाला अनुकूल नव्हता. मात्र यावेळी तो मोठ्या फरकानं आम्हाला अनुकूल असा निकाल लागला आहे. दरम्यान, नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्हाला यश मिळत नव्हतं. तिथे देखील काँग्रेसच्या उमेदवाराच्या रूपाने महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. नागपूरची जागा कायम फडणवीस आणि गडकरींकडे होती. या निकालांवरून असं दिसतं की "महाराष्ट्राचं चित्र बदलतंय" आणि त्या बदलाला सर्वसामान्य लोकांचा मोठा पाठिंबा आहे. एकत्रित येत राज्यातील महाविकास आघाडीनं जी कामगिरी केली आहे, त्यावर लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे, अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. 

'धुळे-नंदुरबारमधील निकाल अपेक्षित निकाल होता. कारण, तिथे निवडून आलेले विद्यमान आमदार होते. राजीनामा देऊन ते पुन्हा उभे राहिले होते. त्यांच्या पाठीशी एक मोठा वर्ग होता, तो कायम राहिल, असं पवार म्हणाले. 
 

maharashtra vidhanparishad graduate constituency results big statement of sharad pawar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT