मुंबई

राज्यातील मतदारांना EVM ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय; विधानसभा अध्यक्षांच्या सूचना

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. राज्यातील मतदारांना आता मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत कायदा करण्याच्या सूचना विधीमंडळाला दिल्या आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाच्या अखरित्यात घेतल्या जातात. या निवडणूकांमध्ये मतदारांना मतदारांसाठी ईव्हिएम मशीन ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय मतदानासाठी उपलब्ध करून देण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधीमंडळाला केले आहे. ईव्हिएमच्या बाबतीत अनेक शंका लोकांच्या मनात आहेत. आपण ज्यांना मतदान केले त्यांनाच मतदान होतं की नाही. याबाबत प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात आहे. याबाबतीत नागपूरातील एका नागरिकाने पटोले यांच्याकडे निवेदन दिले होते. त्याबाबत आता पटोले यांनी या सूचना केल्या आहेत. पटोले यांच्या सूचनेबाबत राज्य सरकार काय पाऊल उचलते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

------------------------------------------------- 

maharashtra voters have the option of a ballot instead of an EVM Instructions of nana patole

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अवकाश विज्ञान तुमच्या दारी! नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ISRO कडून सुवर्णसंधी; ‘युविका 2026’ साठी प्रक्रिया सुरू, कुठे अन कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर

Farmer Success Story: वाट्याने शेत घेऊन अडीच एकरांत १२ लाखांचे खरबुजाचे उत्पादन; वांगीतील चौधरी भावंडांनी घेतले ५० टन फळ; व्यवस्थापनातून अडचणींवर मात!

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

Shaktipeeth Highway: शक्तिपीठसाठी जबरदस्तीने मोजणीचे राज्यभर पडसाद; परभणीतील महिला शेतकऱ्यांना मारहाण, बाधित शेतकरी संतप्त!

'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'

SCROLL FOR NEXT