fish market sakal media
मुंबई

फोर्ट मासळी बाजाराचा वाद सुरुच ; मासळी विक्रेत्यांचा विरोध

समीर सुर्वे

मुंबई : फोर्ट येथील (fort) छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील 398 मासळी विक्रेत्यांच्या (fish traders) पुनर्वसनाचा वाद अद्याप सुरुच आहे.या विक्रेत्यांचे तात्पुरते पुनर्वसन (temporary shifting)आहे त्याच ठिकाणी करुन पुढील वर्षी महात्मा फुले मंडईत (mahatma phule mandai) कायमस्वरुपी जागा देण्यात येणार आहे. मात्र,याला मासळी विक्रेत्यांसह,फुले मंडईतील फळविक्रेत्यांनीही (fruits venders) विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद आता पेटतच राहाणार असल्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक झाल्याने ही इमारत पाडून टाकण्यात आली आहे.त्यामुळे येथील मासळी विक्रेत्यांना ऐरोली जकात नाक्यावर तात्पुरते स्थालांतरीत करण्यात आले.मात्र,या स्थालांतराला विक्रेत्यांनी विरोध केला नंतर शिवाजी मंडईच्या जागेवरच त्यांना तात्पुरत्या शेडचे बांधून देण्यात येणार आहे.या शेडचे गुरुवारी महापौर किशोर पेडणेकर यांच्या हस्ते भुमिपूजन झाले.

तर,2022 पर्यंत या मासळी विक्रेत्यांना महात्मा फुले मंडईत कायमस्वरुपी जागा दिली जाणार आहे.मात्र,या निर्णयाला फुले मंडईत मासे विक्रेत्यांच्या पुनर्वसनाला तेथील पारंपारीक फळ विक्रेत्यांनीही विरोध केला आहे.त्याच बरोबर मासे विक्रेत्यांनी फुले मंडईत स्थालांतरीत होण्यास नकार दिला आहे.छत्रपती शिवाजी मंडईच्या नव्या इमारतींच्या तळ मजल्यावर पुर्वी प्रमाणेच जागा द्यावी अशी विक्रेत्यांनी मागणी केली आहे.

आरक्षण रद्द,करार नाही

शिवाजी महाराज मंडईच्या इमारतीच्या जागेवर बाजाराचे आरक्षण होते.ते आरक्षण रद्द केले आहे.तसेच,विक्रेते हे पालिकेचे भाडेकरु होते.त्यामुळे पुनर्विकास करताना त्यांच्या करार केलेला नाही.त्यामुळे नव्या इमारतीत जागा मिळेल याची खात्री नाही असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT