Maharashtra Winter Assembly Session  esakal
मुंबई

हिवाळी अधिवेशन : रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : विधान सभेचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly Session) आजपासून ( दि. 22 ) सुरु होणार आहे. या अधिवेशनात विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरात राज्यातील भरती घोटाळा प्रकरण चांगलेच गाजले आहे. याच आधारे विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोंडीत पकडणाऱ्या प्रश्नांना प्रत्युत्तर देण्याची रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आज सकाळी 9 वाजता बैठक होणार आहे.

याचबरोबर अनेक विषयांवरुन विरोधपक्ष महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची शक्याता आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यातच केंद्राने इंम्पिरिकल डाटा राज्याला न देण्याने या विषयावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन माजण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Assembly Session) विरोधकांच्या आरोपांना कोणत्या रणनितीने प्रत्युत्तर द्यायचे यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची सकाळी 9 वाजता बैठक होणार आहे.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल चहापानावर बहिष्कार घालत हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत दिले होते. याचवेळी त्यांनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष कोणत्या मुद्द्यांना हात घालणार याचीही झलक दिली होती. त्यांनी 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, शक्ती कायदा करण्याच्या महाविकास आघाडीच्या घोषणेचा मुद्दा यावरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार असल्याचे स्पष्ट केले होते. याचबरोबर ओबीसी आरक्षण, भरती घोटाळा हे ज्वलंत विषय देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT