Ashok Chavan Sakal
मुंबई

MahaVikas Aghadi Morcha : अशोक चव्हाण नाराज? मोर्चाला मारणार दांडी

अशोक चव्हाणांची नाराजी या आधीही अनेकदा उघड झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्ये केली जात आहेत. याच वक्तव्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबई महामोर्चा काढण्यात येत आहे. पण या मोर्चाला अशोक चव्हाण उपस्थित राहणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अशोक चव्हाणांनी ट्वीट करत याविषयी खुलासा केला आहे. त्यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण मोर्चाला उपस्थित राहतील, असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी."

अशोक चव्हाण नाराज असल्याचं या पूर्वीही अनेकदा त्यांच्या कृतीतून दिसलं होतं. अधिवेशनाला अनुपस्थिती, काँग्रेसच्या कार्यक्रमांना दांडी मारणं यामुळे त्यांची नाराजी उघड झाली होती. तसंच शिवसेनेतल्या बंडाच्या काळात काँग्रेसही फुटणार अशी चर्चा सुरू होती, त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडणारे अशोक चव्हाणच अशी चर्चाही रंगत होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मोर्चाला अनुपस्थित राहत आपली नाराजी उघड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT