eknath shinde 
मुंबई

Thane Lok Sabha Candidate: ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला? राजन विचारेंना मिळणार आव्हान

ravi phatak Thane Lok Sabha Constituency: ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार रवी फाटक यांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिची सूत्रांनी दिली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना माजी आमदार रवी फाटक यांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून रवी फाटक महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. विद्यमान ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या विरुद्ध तुल्यबळ लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ( ravi phatak Thane Lok Sabha Constituency Bitter fight against Rajan vichare )

गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक होत आहे. याठिकाणी विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. ठाकरे गटाकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून रवी फाटक यांना समोर केलं जाणार असल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाचे आमदार नरेश म्हस्के यांचे देखील नाव चर्चेत आहे. पण, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, भाजप देखील या मतदारसंघातून प्रयत्न करत आहे. गणेश नाईक यांचे चिरंजीव संजिव नाईक यांच्या देखील नावाची चर्चा सुरु आहे. माहितीनुसार, आमदार संजय केळकर हे देखील लोकसभेसाठी उत्सुक असल्याचं कळतंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT