मुंबई

माहीममध्ये भाजप मनसेत नेक टू नेक फाईट | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माहीममध्ये नेक टू नेक फाईट पाहाला मिळतेय. दुसर्‍या फेरी शेवटी सदा सरवणकर  यांना 5618  मतं  आहेत.  तर मनसेचे दबंग नेते संदीप देशपांडे यांना 4001 मतं मिळाली आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघ होणकडे जातो याची उत्सुकता शिगेला  पोहोचली  आहे. 

माहीम मतदारसंघ. या मतदारसंघात विधानसभेसाठी 47.10 टक्के मतदनाची नोंद झालीये. महाराष्ट्रातील सर्वात कमी मतदान झालेल्या मतदारसंघात माहीम मतदार संघाचा समावेश आहे. या मतदारसंघात मनसेचे दबंग उमेदवार संदीप देशपांडे विरुद्ध शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यात लढत आहे. 

शिवसेनेचा ढाण्या वाघ - सदा सरवणकर

विरोधकांच्या मनात नुसती आग, कारण मैदानात उतरलाय ढाण्या वाघ म्हणत सदा सर्वांकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. नेता किंवा आमदार म्हणून जनतेमध्ये न वावरता आपला हक्काचा माणूस, सुख आणि दुःखात आपल्या सोबत राहणारे आपले लाडके शिवसेना भाजप उमेदवार सदा सरवणकर या शब्दात सदा सरवणकर यांनी प्रचार केलाय. सदा सरवणकर हे माहीम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोबर सदा सरवणकर हे मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील आहेत. 

महाराष्ट्रातील मनसे दबंग - संदीप देशपांडे 

मनसेचा सगळ्यात दबंग उमेदवार म्हणजे संदीप देशपांडे. मुंबईतील मराठीचा मुद्दा, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, अरेसाठी केलेलं आंदोलन.. या सगळ्याच प्रमुख चेहरा म्हणजे संदीप देशपांडे यांच्याकडे पाहिलं जातंय.  " दर ५ वर्षांनी येणाऱ्या निवडणुका मतदारांनी जर गंभीरपणे नाही घेतल्या तर मतदारांच्या आयुष्यातील फक्त ५ वर्ष नाही तर जवळपास एका आख्ख्या पिढीची उमेद, इच्छा, आकांक्षा बरबाद होतात. त्याचा प्रत्यय हळूहळू महाराष्ट्रातील जनेतला येऊ लागला आहेच. म्हणूनच ह्या वेळेस मतदारांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करायला हवं अन्यथा पुढचा काळ कठीण असेल आणि त्याला मतदारच जबाबदार असतील. या शब्दात संदीप देशपांडे यांनी मतदारांना मनसेला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं 

WebTitle : mahim vidhansabha constetuency morning trends


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT