File Photo
File Photo 
मुंबई

खंडाळ्यातील लाईन दुरुस्तीमुळे मेल, एक्सप्रेस रद्द

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : नैसर्गिक आपत्तीमुळे खंडाळा घाट सेक्‍शनची मोठी दुरवस्था झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दीड महिन्यांपासून येथील दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुढील सुमारे चार ते पाच महिने हे काम सुरू राहणार असून दुरुस्तीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक मेल-एक्‍स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामधील काहींचे मार्गही बदलेले असून त्यामुळे पुणे, कोल्हापूर, भुसावळ, नांदेड, हुबळी, पनवेल व मुंबई इत्यादी दिशांकडून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

सुमारे दहा ते बारा मेल-एक्‍स्प्रेस गाड्या रद्द केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरिता अन्य काहीच पर्यायी व्यवस्था केलेली नाही. ऐन सणासुदीच्या काळात मेल-एक्‍स्प्रेस गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्यानंतर हजारो, लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

पुण्याकडून पनवेलला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन गाडीला कर्जत रेल्वेस्थानकात थांबा द्यावा. इंटरसिटी एक्‍स्प्रेसलादेखील कर्जत रेल्वेस्थानकात अधिकृत थांबा देण्यात यावा, अशा मागण्या प्रवाशांकडून होत आहेत.

प्रवासी आंदोलनाच्या तयारीत
पुणे-मुंबई-पुणे असा रेल्वे प्रवास करणारे सर्व प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रचंड प्रमाणात नाराज असून हे प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व रेल रोको करण्याच्या तयारीत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचे योग्य ते निर्णय घेऊन पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा भविष्यात रेल्वे प्रवाशांच्या तीव्र उद्रेकास सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवाशांकडून देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT