मुंबई

भीमा कोरेगाव केस : वर्वरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीनाचा दिलासा

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 22 : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले 80 वर्षीय कवी वर्वरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीनाचा दिलासा मिळाला. मात्र न्यायालयाने कठोर शर्ती लागू केल्या आहेत. राव या प्रकरणातील सर्वात ज्येष्ठ आरोपी आहेत.

वैद्यकीय कारणांमुळे राव यांना जामीन मंजूर झाला आहे. न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने आज जामीन याचिकेवर निकालपत्र जाहीर केले. राव सध्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उच्च रक्तदाब आणि अन्य काही आजार त्यांना झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर सतत देखरेख आणि उपचार करण्याची गरज आहे, असा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. राव यांच्यासह त्यांच्या पत्नीनेही राव यांच्या जामीनासाठी याचिका केली आहे.

एनआयएने या जामीनाला विरोध केला होता. राव यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद करण्यात आला होता. राव यांना न्यायालयाने पन्नास हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. तसेच या जामिनाची मुदत सहा महिने आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःहून एनआयए न्यायालयात शरण यावे, खटल्यात हजेरी लावावी अशा शर्ती न्यायालयाने लागू केल्या आहेत.

main accused of bhima koregaon case varavara rao gets bail from bombay high court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

Zohran Mamdani : ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारतीय वंशाची व्यक्ती बनली महापौर, न्यूयॉर्कमध्ये बसला धक्का; कोण आहेत जोहरान ममदानी?

Mumbai Monorail: मोनोरेल ट्रायल रनमध्येच तांत्रिक बिघाड! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर, विमानतळावर आगमण

Pune News : ‘माझा रोहन मला पुन्हा द्या...’ मृत्यू झालेल्या मुलाच्या आईचा टाहो; ४२ तासांनंतर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT