Worli Hit and Run update in marathi esakal
मुंबई

Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाच्या अडचणीत वाढ; कोर्टाने दिली १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

Worli Hit and Run Case: मुंबईतील वरळी हिट अँड रन घटनेत मुख्य आरोपी मिहीर शाहाला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला शिवडी कोर्टाने १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील वरळी हिट अँड रन घटनेत मुख्य आरोपी मिहीर शाहाला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला शिवडी कोर्टाने १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गाडीची नंबर प्लेट ही गहाळ असून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा युक्तीवाद पोलिसांचा न्यायालयात केला आहे. आरोपीला कोणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. काल पोलिसांनी शहापूर येथून मिहीरला अटक केली होती.

मिहीर लूक बदलून पलायनाच्या होता प्रयत्नात!

मिहीर शहा हा लूक बदलून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली. मिहीरला काल विरार फाट्यावरुन पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं.

सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, मिहीरनं केलेला गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यासाठी लहान मोठ्या गोष्टी तपासायच्या आहेत. आरोपी हा पाळून गेल्यानंतर त्यानं आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला. कारमध्येच त्यानं स्वतःची दाढी केली, केस कापले.

या घटनेच्या तपासासाठी महत्वाचे असलेले CCTV देखील आरोपी डॅमेज करू शकतात, त्यामुळं त्याला पोलीस कोठडी दिली पाहिजे. यात एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे मृत्यू झाला आहे, त्यामुळं अधिकच्या तपासासाठी मिहीर शहाला पोलीस कोठडी मिळाली पाहिजे, असंही सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashutosh Ranka Attack : CJP प्रवक्ता आशुतोष रांका यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण; सरकारी शाळेच्या पाहणीवरून राडा, भाजपवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली? सोशल मीडियावरील मेसेजबाबत स्वत: मुंढे यांनी दिलं स्पष्टीकरण

'मी ज्या मैदानावर खेळले तिथेच माझं मुलही...' जेनिलिया देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाली...

Meta AI on WhatsApp: इमेज जनरेशन ते ट्रॅव्हल प्लॅनिंग! 'मेटा AI' ची ५ भन्नाट फीचर्स जी तुम्ही व्हॉट्सॲपवर वापरू शकता!

Rickshaw-Taxi Fare Hike: रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार; किती भाडे वाढणार?

SCROLL FOR NEXT