मुंबई

महाड खाडीपट्ट्यात अनधिकृत रेती व्यवसायावर मोठी कारवाई; 48 लाखांचा ऐवज जप्त

सुनिल पाटकर


महाड : महाड तालुक्‍यात खाडीपट्टा विभागात गेले अनेक दिवस सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खनन आणि विक्रीवर महाड तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 47 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

महाड तालुक्‍यातील वलंग गावाच्या हद्दीत खाडीकिनारी अनधिकृतरित्या रेती उत्खनन आणि विक्री सुरू असल्याची माहिती महाड उपविभागीय पोलिस अधिकारी एन. तांबे यांना प्राप्त झाली होती. पोकलेनचा वापर करत रेती भरण्याचे काम सुरू असतानाच रविवारी रात्री साडेबारा वाजता ही कारवाई केली. यामध्ये 36 लाख किमतीचा पोकलेन, 3 लाख किमतीच्या दोन 
होड्या, 72 हजार रुपयाची रेती, तीन कार असा एकूण 47 लाख 97 हजार किमतीचा माल जप्त केला. या प्रकरणात शौकत वहाब इसाने (वय 60), शाहनवाज शमसुद्दीन मुकादम (वय 33), लुकमान कादिर चिखलकर (वय 30) अतिक अकबर डांगू (वय 23) फैजल हमीद मुकादम (वय 30) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर जावेद इसाने आणि अमीर देशमुख हे दोघे फरार आहेत. 

याप्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक एम. एन. गवारे हे तपास करत आहेत. 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदी रेशन कार्डला रामराम; महाराष्ट्रात आता मिळणार स्मार्ट रेशन कार्ड; QR कोडयुक्त कार्डला मंजुरी

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

मला वाटलं माझी भूमिका संपली... काही दिवसांपूर्वीच एक्झिट; आता 'कमळी' मालिकेत अभिनेत्रीची पुन्हा एंट्री; कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : कडेकोट बंदोबस्तात ताहिर हुसेन आणि इतर १० आरोपींना न्यायालयात आणण्यात आले

Pali Heavy Rain : बळीराजाचे डोळे ओले! अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भातशेती संकटात

SCROLL FOR NEXT