mercedes car 
मुंबई

NIAची मोठी कारवाई; मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केलेली मर्सिडीज कार जप्त!

सकाळ डिजिटल टीम

व्यापारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात एनआयएकडून (NIA) आणखी एक नवी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंध असलेली स्कॉर्पियो (Scorpio) आणि इनोव्हा (Innova) कार जप्त केल्यानंतर एनआयएनं मंगळवारी एक मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) कारही जप्त केली आहे. मनसुख हिरेन यांनी मृत्यूपूर्वी शेवटचा याचं कारने प्रवास केल्याचं तपासात उघड झालं आहे. 

हिरेन यांनी शेवटचा प्रवास केलेल्या मर्सिडीज कारची एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली जात आहे. या कारच्या तपासातून आणखी काही महत्वाचे धागेदोरे एनआयएच्या हाती लागू शकतात. ही कार १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर असल्याचे दिसून आले आहे. कोणीतरी ही कार घेऊन आल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून याच कारची वाट पाहत असलेले मनसुख हिरेन त्यात बसून गेल्याची नोंदही या फुटेजमध्ये आहे, असं एनआयएनं म्हटलं आहे. 

कारमध्ये आढळून आल्या 'या' गोष्टी

एनआयएनं काळ्या रंगाची मर्सिडीज कार जप्त केली असून त्याचबरोबर स्कॉर्पियो कारची नंबर प्लेट, ५ लाखांहून अधिक रक्कम, एक नोटा मोजण्याची मशीन आणि काही कपडेही या कारमध्ये आढळून आले आहेत. सचिन वाझे यांनी ही कार स्वतः चालवली होती मात्र तिचा मालक कोण आहे याचा तपास सुरु असल्याचं एआयएचे आयजी अनिल शुक्ला यांनी सांगितले.

एनआयएनं आत्तापर्यंत तीन कार केल्या जप्त

एनआयएनं मनसुख हिरेन प्रकरणात अत्तापर्यंत स्कॉर्पियो, इनोव्हा आणि मर्सिडीज या तीन कार जप्त केल्या आहेत. यांपैकी स्कॉर्पियो ही कार स्वतः हिरेन यांच्या मालकिची असून ती २५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळून आली होती. दरम्यान, या कारसह एक इनोव्हा कारची संशयास्पद हालचाल झाल्याचे जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. तसेच मनसुख हिरेन यांनी गायब होण्यापूर्वी ज्या शेवटच्या कारमध्ये बसून प्रवास केला ती मर्सिडीज कार होती. 

मर्सिडीज कारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी संशयीत आरोपी असलेल्या एपीआय सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएनं हिरेन यांनी शेवटचा प्रवास केलेली मर्सिडीज कार जप्त केल्याने यातून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ज्या मर्सिडीज कारमधून ती त्यांनी प्रवास केला ती कोणाच्या मालकीची आहे आणि त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं हे देखील या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

SCROLL FOR NEXT