उमेदवार कार्यकर्त्याबराेबर संवाद साधण्यात गुंतले असल्याने पक्ष कार्यालयात शुकशुकाट आहे.
उमेदवार कार्यकर्त्याबराेबर संवाद साधण्यात गुंतले असल्याने पक्ष कार्यालयात शुकशुकाट आहे.  
मुंबई

रायगडमधील उमेदवारांची धावाधाव

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग ः विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सभा, बैठका, प्रचारफेऱ्या अशा व्यग्र दिनचर्येत रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य उमेदवार होते. त्यांना मतदानानंतरही दिलासा मिळाला नाही. आहे उसंत कोठे, येथे निवांत बसायला, असे म्हणत ते निवडणूक खर्च, मतदारसंघाचा आढावा, आकडेवारी अशा कामांत मंगळवार सकाळपासूनच मग्न आहेत. निवडणूक निकाल गुरुवारी (ता.24) लागणार आहे. 

विधानसभेसाठी सोमवारी मतदान झाले. त्यानंतर प्रमुख पक्षांचे उमेदवार विश्रांती न घेता कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यासाठी बाहेर पडले. काहींनी तातडीने मतांचे गणित तपासण्यास सुरुवात केली. महाड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले कार्यकर्त्यांच्या गराड्यात होते. विजयाच्या आशेने कार्यकर्तेही उत्साहात असल्याने मोबाईलवर बोलण्यासही त्यांना सवड नव्हती. अलिबाग मतदारसंघातील शेकापचे उमेदवार सुभाष (पंडितशेठ) पाटील यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला. 

अलिबागमधील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी हे कुसुंबळे येथील हाणामारी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. दुपारनंतरचा वेळ त्यांनी कोर्टात घालवला. 
पेण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवीशेठ पाटील यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यांनीही मतदानानंतर मंगळवारी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यावर भर दिला. कर्जत मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी दुपारनंतर विश्रांती घेण्यास पसंती दिली. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर 26 व्या दिवसांत निवडणूक निरीक्षक येतात. त्यानंतर सात दिवसांत अंतिम निवडणूक खर्च द्यावा लागतो. उमेदवाराला 28 लाख रुपयांची खर्चमर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीच्या नियमानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे अनेक उमेदवार दक्षता घेतात. 
- दत्तात्रय पाथरुट, खर्च सनियंत्रण समितीप्रमुख 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT