खटल्यास गैरहजेरीची मागणी हा बनाव! डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा आरोप 
मुंबई

खटल्यास गैरहजेरीची मागणी हा निव्वळ बनाव! डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा आरोप

सुनिता महामुनकर

मुंबई  : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्‍टरांनी कोरोना संसर्गाच्या सबबीखाली खटल्यास गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे. मात्र हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.

आरोपी डॉ. हेमा अहुजाने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या न्यायालयात आरोपींच्या विविध अर्जावर सुनावणी सुरू आहे. अद्यापही खटला सुरू झाला नाही, त्यामुळे न्यायालयात सुनावणीला अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हेमा यांनी केली आहे. मात्र या मागणीला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी लेखी खुलासाद्वारे विरोध केला आहे. सध्या टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयात हेमा कोविड कर्तव्यावर आहे. रुग्णालयात काम करायचे आहे ही आरोपीने दिलेली सबब निव्वळ धूळफेक आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा डॉक्‍टरांची अत्यंत गरज होती. तेव्हा आरोपी अहुजा मुंबईत नव्हत्या. तेव्हा मुंबईत डॉक्‍टर म्हणून माझी गरज आहे किंवा मला रुग्णांची सेवा करायची आहे, अशी भूमिका तेव्हा त्यांनी घेतली नाही. मात्र आता पदव्युत्तर अभ्यासाचे कारण त्या देत आहे, अशा शब्दांत पोलिसांनी विरोध केला आहे. 

पायलच्या आईचाही अर्जास विरोध 
अहुजा यांच्यासह भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तिघींनाही पुढील शिक्षणासाठी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली असून, न्यायालयात हजेरी लावण्याचे निर्देशही दिले आहेत. मागील वर्षी मेमध्ये पायलने वसतिगृहातील खोलीमध्ये आत्महत्या केली होती. आरोपींनी जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या आईने केला आहे. पायलच्या आईनेही या अर्जाला विरोध केला आहे. 

-----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT