मुंबई

आता घरबसल्या बनवा देशी विदेशी मद्य! तळीरामांनी शोधला जालीम उपाय

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशात कोरोनामुळे 21 दिवसांचे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे मद्याची दुकाने बंद आहेत. मात्र, तळीरामांनी यावरही उपाय शोधून काढला आहे. युट्यूबवर आॅनलाईन पद्धतीने वाईन मेकर्स चॅनलच्या माध्यमातून घरबसल्या देशी-विदेशी मद्य तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वाईन मेकर्स नावाच्या युट्यूब चॅनलवर विविध मद्य तयार करण्याच्या पद्धती दाखवत असल्याने तळीरामांकडून अशा रेसिपीचा वापर घरोघरी होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लाॅकडाऊनमुळे सध्या अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तर सरकारमान्य मद्याची दुकाने बंद आहेत. नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, मद्याची दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच फजिती झाली आहे. त्यामुळे अवैधरीतीने जादा किमतीत मद्य विकत घेऊन तळीराम आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या राज्यात 3 एप्रिलपर्यंत अवैध मद्य विक्रीचे 1221 गुन्हे दाखल झाले असून, सुमारे 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
सरकारी मद्य विक्री बंद असल्याने‌ अवैध मद्य विक्रीमध्ये राज्यात वाढ झाली असताना आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देशी, विदेशी मद्यनिर्मितीची रेसिपी सांगितली जात आहे. त्यामध्ये मद्य तयार करून ते पिण्यास योग्य की अयोग्य इथपर्यंत मार्गदर्शन ही युट्यूबच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे नियमित मद्य पिण्याची सवय असलेल्या तळीरामांकडून अशा युट्यूब चॅनलचा गैरवापर होऊन घराघरात मद्यनिर्मिती होण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार 1949 च्या कलम 23 व 73 नुसार कारवाई तसेच आयटी अक्ट कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल.
- कांतीलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT