मुंबई

Mumbai: मुंबईतील उड्डाणपुलाचे दोन वेळा होणार उद्घाटन,पालिका प्रशासनाची गोची

Latest Malad News: आता पुन्हा उद्‍घाटन होणार असल्याने पालिका प्रशासनाची मात्र गोची होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: मालाड पश्चिम येथील मीठ चौकी येथे पालिकेद्वारा बांधलेल्या पुलाचे उद्‍घाटन दोन वेळी करण्यात येणार आहे. मीठ चौकी मार्वे रोड आणि लिंक रोड जंक्शनवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुलाची निर्मिती करण्यात आली.

हा पूल तयार असून येथे साफसफाई व शेवटचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या वेळचे मुंबईचे पालकमंत्री, तसेच मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार यांनी पुलाच्या बांधकामाचे उद्‍घाटन केले होते, मात्र आता पुन्हा उद्‍घाटन होणार असल्याने पालिका प्रशासनाची मात्र गोची होत आहे.

त्यापूर्वी मालवणीहून मालाड व लिंक रोडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी मीठ चौकी येथे पुलाची गरज असून ते लवकरात लवकर बांधण्यात यावे, अशी मागणीदेखील केली होती, तसेच त्यावेळचे भाजप उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित विभागाला पत्र दिले होते.

त्यामुळे आता भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते पुलाचे उद्‍घाटन होणार असल्याच सांगण्यात येत आहे. हे उद्‍घाटन ६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे, तसेच स्थानिक आमदार आणि माजी पालकमंत्री मुंबई असलम शेख हेही १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या समर्थकांसह पुलाचे उद्‍घाटन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. खासदार-आमदारांच्या श्रेयवादामुळे मात्र पालिका व इतर प्रशासनाची गोची होत आहे.

हा पूल सुरू झाल्यानंतर मालाड, तसेच लिंक रोड होत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मीठ चौकी सिग्नलवर थांबावे लागणार नसल्याने वेळ वाचणार आहे.

पुलाचे उद्‍घाटन कोणीही करो, आम्हाला आनंदच आहे. कारण, वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

वाहनचालक - ओंकार महाडिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात ढगाळ वातावरण कायम, 'या' ५ जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार; हवामान विभागाचा अंदाज

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 फेब्रुवारी 2026

U19 World Cup: भारताच्या पाकिस्तानवरील विजयाने सेमीफायनलचं वेळापत्रक निश्चित! जाणून घ्या कोणाविरुद्ध अन् कधी होणार सामना

आजचे राशिभविष्य - 2 फेब्रुवारी 2026

Satara News: अजितदादांच्या आठवणींनी दाटला नेत्यांचा कंठ; साताऱ्यातील सर्वपक्षीय शोकसभेत हळहळ, विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार!

SCROLL FOR NEXT