उलव्यात मलेरिया, डेंगीचे रुग्ण अधिक
उलव्यात मलेरिया, डेंगीचे रुग्ण अधिक 
मुंबई

उलव्यात मलेरिया, डेंगीचे रुग्ण अधिक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : उलवे परिसरात मलेरिया, डेंगीचे रुग्ण वाढत असल्याची तक्रार येथील रहिवाशांकडून केली जात आहे. परिणामस्वरूप खासगी रुग्णालयांमध्येही डेंगीच्या रुग्णाची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. महिन्याला सरासरी १० ते १५ रुग्णावर उपचार केले जात असल्याचा दावा या भागातील खासगी रुग्णालयांकडून होत आहे. याउलट सिडको प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून उलव्यात डेंगीचे रुग्ण नसल्याचे सांगितले जात आहे. 

उलव्यात विकासकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यातच पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडून चाळण झाली आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साठल्याने तसेच कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने उलवे परिसरात दुर्गंधी तर वाढली आहेच. पण डासांची संख्याही वाढली आहे. मोकळे भूखंड, मोकाट वाढलेली झाडेझुडपे, त्यामध्ये साचणारे पाणी, रस्त्यावर, मोकळ्या भूखंडावर; तसेच झुडपांमध्ये टाकला जाणारा कचरा, वेळेत न होणारी औषधफवारणी यामुळे डासांचा उपद्रव वाढत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. 

याबाबत सेक्‍टर- ५ मधील एका खासगी रुग्णालयामार्फत माहिती देण्यात आली की, गेल्या महिन्यात आमच्याकडे उलवे परिसरातील डेंगीचे ७ रुग्ण होते. दर महिन्याला डेंगीचा एखाद-दुसरा रुग्ण असतोच. येथे डासांचा उपद्रव अधिक असल्याने रुग्णांची संख्या अधिक आहे. सेक्‍टर- १९ मधील रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले की, दर महिन्याला १५ ते २० रुग्ण डेंगीचे असतात. एरव्ही टॅप, सर्दी, खोकल्याचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर असतात. मागील दोन महिन्यांत सर्दी-तापाचे रुग्ण अधिक होते; तर उलव्यातील एका निदान केंद्राकडून सांगण्यात आले की, सिडको प्रशासनाने जूनमध्ये परिपत्रक काढून डेंगी, मलेरिया रुग्णांचा अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार हा अहवाल नागरी आरोग्य केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. डेंगीचे सरासरी ४ रुग्ण; तर मलेरियाचे १० रुग्ण उलवे परिसरात आहेत. 

उलव्यातील शहरी आरोग्य केंद्रात डेंगीसाठीची सर्व सुविधा, औषधे उपलब्ध आहेत. मात्र डेंगीचे रुग्ण नाहीत, त्या संदर्भात काही माहिती उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयांना आरोग्य विभागाने पत्राद्वारे डेंगी, मलेरियाचे रुग्ण आढळल्यास ताबडतोब आरोग्य विभागाला माहिती द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. 
- संदेश पोखरणकर, स्वच्छता अधिकारी, उलवे, (सिडको).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT