Malegaon-Bomb-Blast
Malegaon-Bomb-Blast 
मुंबई

आरोपनिश्‍चितीला स्थगिती नाही

सकाळवृत्तसेवा

साध्वी प्रज्ञासिंह, पुरोहितची मागणी फेटाळली
मुंबई - मालेगाव येथील 2008 मधील बॉंबस्फोटप्रकरणी ले. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात सत्र न्यायालयात बुधवारपासून आरोपनिश्‍चितीची प्रक्रिया सुरू होत आहे, तिला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

'या आरोपींनी सादर केलेल्या दोषमुक्तीबाबतची याचिका प्रलंबित असल्याने आरोपनिश्‍चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देता येणार नाही. या तिघांविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) गुन्हे दाखल करता येतील काय, याचा निर्णय विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयाने घ्यावा,'' असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मालेगाव स्फोटप्रकरणी मुंबईतील विशेष "एनआयए न्यायालया'ने यापूर्वी 27 डिसेंबर 2017 ला "मोका'अंतर्गत आरोपनिश्‍चिती केली होती. यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील "मोका' हटवण्यात आला होता. याप्रकरणी आपल्याला दोषमुक्त करावे, यासाठी प्रज्ञासिंह यांच्यासह पुरोहित, समीर कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. मृदुला भाटकर आणि न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT